Published On : Wed, Jun 9th, 2021

कामठी नगर परिषद च्या 45 टेंडरला मिळाला स्थग्नादेश

Advertisement

कामठी :-कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या दलित वस्त्यांचा विकासासह इतर वस्त्यांचा विकास व्हावा या मुख्य उद्देशाने कामठी नगर परिषद ला प्राप्त शासकीय निधीतून दलित वस्ती , नगरोत्थान आदी योजनातुन अंदाजे 8 कोटी रुपयांचे 45 कामाचे कंत्राट बोलाविण्यात आले होते .

या कंत्राटी कामातून 45 कामाचे टेंडर बोलावून शक्य त्या सर्व प्रोसेस सुद्धा करण्यात आल्या आहेत. मात्र हे टेंडर मिळण्याच्या सप्सर्धेत कंत्राटदारांनी 28 टक्के बिलो पर्यंत कंत्राट घेतले.आता हे कंत्राट घेताना 28 टक्के बिलो , त्यात ही नगराध्यक्ष, मुख्याधिकारी ला देण्यात येणारी कमिशन या सर्व पद्ध्तीत कामे हे निकृष्ट दर्जाचे होणार असून कामात सर्रास अनियमितता होत नागरिकांच्या हक्काशी सर्रास खेळ मांडणारा आहे.

तेव्हा नागरिकांच्या हक्काशी खेळ न व्हावा व ऐनवेळी कामाची गुंणनियंत्रक विभागाकडून चौकशी करण्याची वेळ न यावी यासाठी नरेंद्र शर्मा यांनी जिल्हाधिकारी कडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कामठी नगर परिषद च्या 45 ही कंत्राटी कामांना स्थग्नादेश दिला आहे.