| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jun 17th, 2019

  आडका गावात श्रमदानातून ग्रामस्वच्छतेला गती

  कामठी :- ‘गाव स्वच्छ तर ग्रामस्थ स्वस्थ’या संकल्पनेनुसार कामठी तालुक्यातील आडका गावात सरपंच भावना चांभारे यांच्या नेतृत्वात मागील दोन महिन्यांपासून महिलाससंवेत श्रमदानातून ग्रामस्वच्छतेला गती आली आहे ज्यामुळे गावात स्वछता नांदत असून ग्रामस्थांनी स्वच्छतेकडे लक्ष पुरवीत गाव ।स्वच्छतेची जणू काही कास धरली आहे यामध्ये घरासह ग्रामस्वच्छता ही एक मुख्य जवाबदारी असल्याच्या मानसिकतेतून ग्रामस्थ महिला सह पुरुषवर्ग सुद्धा करीत असलेल्या सामूहिक श्रमदानातून गावात स्वछता नांदत आहे.

  कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या आडका गावातील महिला वर्ग ह्या सरपंच भावना चांभारे यांच्या नेतृत्वात सामूहिक रित्या गावातील केरकचरा साफ करीत आहेत तर हे श्रमदान नुसते देखावा म्हणून वा फोटोशॉपी पर्यंत न राहता तबबल दोन महिन्यांपासून निरंतर सुरू आहे .

  यामुळे गावात ।स्वचछता नांदण्यासह एकमेकांत एकात्मतेची भावना निर्माण होत आहे. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या श्रमदानामुळे सरपंच भावना चांभारे तसेच श्रमदानात सहभागी असलेल्या ग्रामस्थ महिलांचे प्रशासनातर्फे कौतुक करण्यात येत असून या प्रकारची मानसिकता इतर गावात ही बदलल्यास गावात ग्रामस्वछता सह ग्रामस्वस्थता सुद्धा नांदनार हे मात्र नक्की.

  संदीप कांबळे

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145