Published On : Mon, Jun 17th, 2019

आडका गावात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट

Advertisement

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या आडका गावात भर उन्हाळयात मागील दोन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती यासाठी पाण्याची गरज भागविण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली होती तर ग्रामपंचायत च्या वतीने पूरविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा केंद्रातून नळाला येणारे पाणी हे अतिशय कमी दाबाने येत असल्याने गावात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या गांभीर्याने लक्षात घेता कामठी तालुका कांग्रेस कमिटी महिलाध्यक्षा प्रा अवंतीकाताई लेकुरवाळे, विजय खोडके,.अमोल खोडके., निरंजन खोडके , ग्रमपंचायत केम चे उपसरपंच अतुल बाळबुधे. ,विष्णु नागमोते यांनी ।गावात पाण्याचे टँकर ची सोय करून गावातील लोकाची पीण्याचा पान्याची समस्या दूर करन्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच ही पाण्याची समस्याचा लवकरात लवकर निराकरण करण्यात यावा अशी ग्रामपंचायत प्रशासनाला मागणी करण्यात आली. तर वेळीच मदतीची धाव घेऊन ग्रामस्थांना पाण्याची सोय करून दिल्याबद्दल गावकऱ्यांनी प्रा अवंतिकाताई लेकुरवाडे, तसेच आदी सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले.

बॉक्स:-,भावना चांभारे(सरपंच आडका ग्रामपंचायत) विजेची बचत व्हावी या मुख्य उद्देशाने गावात सौर ऊर्जा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामपंचायत तसेच पाणी पुरवठ्याचा कारभार हा सौर उर्जावर होणार असून गावकऱ्यांना सुद्धा सोयीचे होणार आहे दरम्यान सौर उर्जेशी जोडण्यात आलेल्या पाणी पुरवठा मुळे ग्रामस्थाना काही ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा तर काही ठिकाणी कमी दाबाचे पाणी पुरवठा होत असून गावात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या ही लक्षात घेता पूर्ववतरीत्या उच्च दाबाचा पणोपूरवठा ची सोय करण्यात येणार असल्याची माहिती दिली.