नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगा-जमुना परिसरात एका चष्मा विक्रेत्यावर दोन युवकांनी चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्की नागरे हा युवक मंगळवारी सायंकाळी गंगा-जमुना परिसरात चष्मे विक्रीचे काम करत होता. यावेळी दोन युवक त्याच्याजवळ आले आणि त्याला शिवीगाळ करू लागले. शिवीगाळ करण्याचे कारण विचारताच दोन्ही आरोपींनी संतापाच्या भरात लक्कीवर चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात लक्की गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच जखमीचा भाऊ विक्की नागरे याने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान अफरोज अन्सारी या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तर त्याचा साथीदार तौसीफ हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अफरोज अन्सारीविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्यासह विविध गुन्हे नोंद आहेत. फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





