Published On : Sat, Aug 24th, 2019

-झंझावाती व्यक्तीमत्वाला देश मुकला – ऊर्जामंत्री बावनकुळे

Advertisement

वर्धा :- प्रख्यात वकील, प्रभावी संसदपटू व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन अत्यंत दुख:द असून त्यांच्या निधनामुळे देश एका झंझावाती व्यक्तीमत्वाला मुकला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उर्जामंत्री व नागपूर- वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात कायदेमंत्री व जलवाहतूक मंत्री म्हणून जेटली यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर देशात आर्थिक शिस्त आणली.

अत्यंत महत्वाची कामगीरी
त्यांनी या काळात पार पाडली. विद्यार्थी नेता ते राजकारणी हा त्यांचा झंझावाती प्रवास होता. आणिबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. अशा अत्यंत सक्रिय कार्यकर्त्याच्या जाण्याने भाजपाचे न भरुन निघणारे नुकसान झाले असल्याची भावनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केली.