Published On : Wed, Aug 7th, 2019

विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी रामटेक पोलीस स्टेशनला दिली भेट

वार्षिक निरीक्षण दरम्यान अधिकारी व कर्मचारी यांच्या जाणून घेतल्या समस्या

रामटेक : नागपुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी येथे वार्षिक निरीक्षण दरम्यान रामटेक पोलीस स्टेशनला नुकतीच भेट दिली .यावेळी त्यांच्या सोबत पोलीस अधीक्षक राकेश ओला ,अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत ,उपविभागीय पोलीस अधिकारी नयन आलूरकर यांची उपस्थिती होती.

विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी यावेळी पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड , कार्यालय ,परिसर स्वच्छतेबाबत पाहणी केली व समाधान व्यक्त केले . तसेच पोलीस स्टेशनमधील अधिकारी ,कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .

पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांनी पोलीस स्टेशनच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी तसेच सामाजिक सौहार्द शांततामय वातावरण निर्माण करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नाबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी समाधान व्यक्त केले .

सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले, पोलीस उपनिरीक्षक राजू मुत्तेपोड , मिलिंद सरकाटे ,प्रमोद कोलेकर, अतुल कावळे ,श्रीकांत हत्तीमारे , पोलीस शिपाई व कर्मचारी यांनी निरीक्षण दरम्यान सहकार्य केले.