Published On : Sun, Jul 28th, 2019

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 58.21 कोटी विशेष अनुदान मंजूर

पालकमंत्र्यांचे ग्रामविकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

नागपूर: जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सन 2019-20 साठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी नागरिक जनसुविधा अंतर्गत 58.21 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील 616 ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी मोठी रक्कम उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील 616 ग्रामपंचायतींना जनसुविधेकरिता 4434.50 लक्ष निधी मंजूर झाला आहे, तसेच नागरिक सुविधा अंतर्गत 36 ग्रामपंचायतींना 1386.29 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

जनसुविधा अंतर्गत स्मशान शेड, स्मशान भूमी, पोच रस्ता, पिण्याचे पाणी, संरक्षण भिंत, शोकसभा शेड, भूमिगत गटारे बांधकाम, सुलभ शौचालये, खडीकरण रस्ते, ग्रामपंचायत भवन आदी कामे, होणार आहेत.

गावाचा विकास साधण्यास ग्रामपंचायतींना मोठी मदत या निधीमुळे होणार आहे. ग्रामपंचायतींचे सरपंच आणि गावकरी यांच्या यामुळे आनंदाचे वातावरण आहे.