नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगानेही युद्ध पातळीवर तयारीला सुरुवात झाली आहे. १३ मार्चनंतर लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच एक महत्वाची बातमी समोर आली.
येत्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच अपंग, वृद्धांना आता घरातून मतदान करण्याची संधी मिळणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यंदा लोकसभेत ८० वर्षांपेक्षा अधिक आणि दिव्यांग व्यक्तींना घर बसल्या मतदान करण्याचा मूभा देण्यात आली. निवडणुकीमध्ये काही धोरणात्मक बदल झाले आहेत. पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे.
अशी असणार मतदान प्रक्रिया :-
अपंग, वृद्धांना घरी बसून मतदानाचा प्रयोग यापूर्वी कसबा पोट निवडणुकीत करण्यात आला होता. निवडणूक जाहीर झाल्यानंतर वृद्ध व दिव्यांग लोकांना १२ ड फॉर्म घरपोच दिला जाईल. त्यांच्याकडून ऑप्शन देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला जाईल. मतदान सुरू होण्याअगोदर या लोकांचे मतदान करून घेण्यात येईल. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी हा प्रयत्न आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करून मतदान करता येणार आहे. ५० टक्के पोलीस स्टेशन वेब कास्टिंगला जोडली जाणार आहेत. याची थेट लिंक निवडणूक आयोगाकडे असणार आहे.