Published On : Mon, Sep 4th, 2017

आधार नोंदणीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात 9 व 10 सप्टेंबर रोजी विशेष मोहिम

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरीकांसाठी आधार नोंदणीकरीता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई, येथे दि. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माहिती दिली आहे.

आधार नोंदणी न केलेल्या नागरिकांनी जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, महाविद्यालय सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एका तसेच रहिवासाचा पुरावा म्हणून बँकेचे पासबुक, शिधावाटप पत्रिका, दूरध्वनी देयक, विज देयक तसेच इतर पुराव्यांपैकी कोणत्याही एक पुराव्याच्या मुळ प्रतीसह व छायांकित प्रती स्वयंसाक्षांकित करुन उपस्थित रहावे.

आधार नोंदणी न केलेल्या नागरिकांनी आधार नोंदणीच्या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.