Published On : Thu, Sep 5th, 2019

ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या आश्रयदात्या नोरिको ओगावा यांच्या निधनानिमित्त विशेष बुद्ध वंदना

विशेष बुद्ध वंदनेतून वाहली सामूहिक श्रद्धांजली

कामठी :- कामठी येथील विश्वविख्यात विश्वप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या आश्रयदात्या महाऊपासिका मॅडम नोरिको ओगावा यांचा दीर्घ आजराने 2 सप्टेंबर ला टोकियो येथील जिकेका हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाले .यांच्या या दुःखद निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून बौद्ध धम्माची एक प्रसार व प्रचारक महान बौद्ध उपसिका गमावला असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

या दुःखद समयी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे ह्या टोकियो येथील नोरिको ओगावा यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिव देहावर पुष्पगुच्छ अर्पण करून श्रद्धांजली वाहली तर आज सकाळी साडे नऊ वाजता कामठी येथील जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्यनिय भन्ते यांच्या मुख्य उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेऊन बुद्धवासी नोरिको ओगावा यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी नलिनीताई कुंभारे, सुकेशीनी मुरारकर, अजय कदम, वंदना भगत, अशोक नगराळे, भीमराव फुसे, पानतावणे, नरेंद्र चव्हाण, राजेश नानवटकर, सुरेश पाटील, नंदाताई गोडघाटे,रजनी लिंगायत, अजय कदम, उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर, मुस्ताक अली, मोबीन पटेल, विष्णु ठवरे, मनोहर गणविर, राजेश गजभिये, उज्वल रायबोले, सुशील तायडे, शालीकराम अडकने, राजेश शंभरकर, मनीष मेंढे,शरद राहाटे, शुभम रंगारी, सागर भावे, अमोल मेश्राम, सावला सिंगाडे, सीमा सोमकुवर, समरीत पंचभाई, कुसुम खोब्रागडे, रजनी गजभीये,जीजाबाई वाहाणे, रेखा मेंढे, मोपेडवार मैडम, पाटील मैडम, आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी