Advertisement
नागपूर : मनपाच्या धंतोली झोन सभापती वंदना भगत यांनी मिहान येथील एम्स लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी नगरसेविका विशाखा बांते, डॉ. सुजित, प्रवीण साळवे, राजेश वासनिक आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी एम्समध्ये ज्येष्ठांसाठी असलेल्या लसीकरण व्यवस्थेची पाहणी केली. तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना लसीकरणाबद्दलची संपूर्ण माहिती दिली.
तेथील व्यवस्थेबद्दल झोन सभापती वंदना भगत यांनी समाधान व्यक्त केले. ज्येष्ठांनी ऑनलाईन नोंदणी करावी. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळावी. यासाठी झोन कार्यालयातही नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन धंतोली झोन सभापती वंदना भगत यांनी केले.