Published On : Mon, Mar 8th, 2021

मातृत्व हे एक शाप कि अभिशाप:-रंजनाताई पानतावणे

Advertisement

कामठी :-स्त्री म्हणजे लाजाळू,दुबळी व भावनिक असा समाजात गैरसमज आहे .परंतु वेळ पडल्यास हीच घरातील लक्ष्मी बिकट परिस्थितीला तोंड देऊन यशस्वी जीवनाची वाटचाल सुद्धा पार पाडते हे सगळे शक्य झाले आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे व संविधानाने दिलेल्या हक्कामुळेच आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडी मारत आहें अशीच कामठीतिल जय भीम चौक रहिवासी एक महिला काही वर्षांपूर्वी पतीच्या जाचक त्रासाला कंटाळून 1 वर्षांची मुलगी व 2 वर्षाच्या मुलासह घराबाहेर पडून एकाकी जीवन जगत असताना कुणाचेही सहकार्य नसल्याने लेकरांचे पालनपोषण करुण त्यांचा संभाळ व् त्यांचे उज्वल भविष्य हे एक आव्हान च होते त्यावेळी मातृत्व हे एक शाप की अभिशाप अशी भावना एकाकी जीवन गाठनारी आई रंजना अशोक पांनतावने यांना पडला होता.

तेव्हा आत्मसम्मानाचे जीवन जगून मुलांचाहि उज्वल भविष्य गांठने है एक उद्देश्य ठेवून हालखिच्या परिस्थितीत मोलकरणीच्या कामापासून जीवनाची सुरुवात करीत लेकरांचे पालनपोषण केले व् लग्नसमारंभात खानावळी चे काम करीत परिश्रमातुन गृहउद्योगच्या माध्यमातून रंजना आचारी या नावाने खानावळी चा स्वताच्या व्यवसाय थाटूंन जीवनात यश गाठले , मुलीचे लग्न केले , व् मुलगा हा आईच्या उद्योगत सहकाऱ्या करित कुटुंबाचा उदरर्निर्वाह करित आहेत तर या रंजनताई च्या हातच्या जेवनाची चव लोकना विसरताच येत नाही संपूर्ण कामठी शाहरातच नव्हे तर बाहेर इतर ठिकाणी सुद्धा यांच्या रंजना आचारिचो म्हणून प्रसिद्धि पावली आहे व् या व्यवसायतूंन काही बेरोजगार मुले व् महिला रोजगार करीत आहेत .व् आज ही महिला एकदम हालखिच्या परिस्थितितुंन बाहेर पडून स्वताच्या भरवश्यवर यशस्वी जीवन गाठले आहे.

रंजना पांनतावने ह्या जयभीम चौक निवासी असून 25 वर्षापुरवि नायगोदाम येथील अशोक पांनतावने यांच्याशी बौद्ध विवाह पद्धतिने लग्न झाले ज्यातुंन यांना एक मुलगा व् 1 मुलगी जन्मास आल्यानंतर पतिच्या नेहमीच्या जाचक त्रासाला कंटाळून 2 वर्षीय मुलगा 1 वर्षीय मुलीला घेवून कायमचे सासर्चे घर सोडून घराबाहेर पडले अशे वेळी लेकरांचे पालनपोषण व् आत्मसम्मानाचे जीवन हे दोन्ही आव्हान समोर ठेवून घरोघरी जॉउन मोलकारींन चे काम करीत भड्याच्या घरात राहून हालखिच्या परिस्थितीत जीवन गाठत असताना लेकरांना शिक्षण सुद्ध दिले व् हळूहळू लोकांच्या वक्रदृष्टितुंन बचाव करीत आत्मसम्मान कायम ठेवित लग्नसमार्ब्ज कार्यक्रमात खानावळी चे काम सुरु केले व् मुलगी वयाची होताच लग्न करुण दिले

.व् रंजना आचारी या नावाने व्यवसाय थाटून बेरोजगारना ही रोजगार देत स्वतःचे घर सुद्धा तैयार केले आज हे यशस्वी जीवन गठत असून समाजसेविकेची भावना ठेवून 2017 मध्ये संपन्न झालेल्या कामठी नगर परीषद निवडनुकीत प्रभाग क्र 11 मधून उमेदवार राहिले नागरिकांनी यांना भरघोस मतदान सुद्धा दिले मात्र अल्पशा मतांनी यांना पराभव स्वीकारावा लागला तरि त्या आत्मविश्वास कायम ठेऊन समाजसेवेत अजूनही कार्यरत आहे.

संदीप कांबळे कामठी