Published On : Fri, Jul 19th, 2019

स्पेनटेक्स कामगारांना व्यवस्थापनाकडून समझोत्याची फुंकर!

Advertisement

कामगारांच्या एकजुटीने व्यवस्थापनाचा उधळला कट*

नागपूर: बुटी बोरी औधोगिक क्षेत्रामधील स्पेनटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील कामगारांना मागील काही महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली होती.वेतन तर मिळालेच नाही शिवाय गेले दोन वर्षांपासून येथील कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्यामुळे त्यांच्यावर जीवन मरणाची वेळ आलेली असतांना कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या जखमेवर मीठ चोळन्याचे षडयंत्र रचल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.कंपनीवर बोजवारा असल्याचे सांगून गेले काही महिन्यांपासून कंपनीने विजेचे बिल भरले नसल्याने तसेच कंपनीला आवश्यक असलेला सर्व पुरवठा खंडित झाल्याने कंपनी बंद होती.या परिस्थितीला व्यवस्थापनाने कामगारांनाच दोषी ठरविले होते.परंतु त्यांच्या कोणत्याही कुटील कारस्थानाला बळी न पडता कंत्राटी कामगार आणि स्थायी कामगारांच्या एकजुटीने व्यवस्थापनाचा कंपनी बंद करण्याचा डाव उधळून लावला.व अखेर कंपनीने नमते घेत कामगारांच्या विविध मागण्याकरिता कामगारांसी समझोता करार करून फुंकर मारण्याचे काम केले आहे.

बुटी बोरी औधोगिक क्षेत्रातील स्पेनटेक्स कंपनी ही नावाजलेली कंपनी असून ती इंडोरमा कंपणीचाच एक भाग आहे.परंतु २००६ मध्ये ही कंपनी चौधरी यांनी हस्तांतरित करून स्वतःची वेगळी चूल मांडली आणि तेव्हापासूनच स्पेनटेक्स कामगारांवर आर्थिक विवंचनेचा जणू डोंगरच कोसळला.

कंपनी करारानुसार मागील बत्तीस महिन्याचा एरियस अजूनही कामगारांना दिला नव्हता.२०१८ च्या दिवाळीचा ७५ टक्के बोनस देऊन कामगारांची बोळवण केली गेली त्यातला २५ टक्के उर्वरित बोनस अजूनही मिळाला नव्हता.प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांना त्यांचा आर्थिक हक्क मिळत नसल्यामुळे त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला.कामगारांच्या हक्काचा भविष्यनिधी नोव्हेंबर २०१६ पासून व्यवस्थापनाने भरलेला नाही त्याच बरोबर आरोग्य विम्याची रक्कम त्यांच्या वेतनातून कपात करून भरली नसल्याने त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांच्या उपचारावर प्रश्न चिन्ह तयार झाले.कामगारांनी आपल्या सुरक्षेकरिता जीवन विमा काढला त्याची सुद्धा रक्कम त्यांच्या पगारातून कपात केली गेली परंतु ती देखील विमा कार्यालयात जमा केली गेली नाही.कामगारांनी स्वताच्या सुविधेकरिता सोसायटी सुरू केली त्यांच्यात सुद्धा कंपनी व्यवस्थापनाने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

मागील काळात याच शोषणाला त्रासून रविशंकर रहांगडाले नामक येथील कामगाराने आत्महत्या केल्याची चर्चा असून कुंजीलाल पारधी या कामगाराचे निधन झाले होते.मृतकांच्या परिवाराला मदत म्हणून कंपनी व्यवस्थापनाने दोनशे रुपये प्रत्येकी असे आर्थिक मदत कामगारांकडून कपात केली होती परंतु ती जमा केली गेलेली रक्कम अजूनही त्यांना दिली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.याची चौकशी केली असता ती रक्कम मृतकांच्या परिवाराला दिली आहे असी खोटी बतावणी व्यवस्थापणाकडून केली जात होती असी माहिती देण्यात आली.दरवर्षी गणवेश आणि सेफ्टी शूज देण्याचा नियम असून सुद्धा व्यवस्थापनाने गेल्या तीन वर्षांपासून त्याची पूर्तता केली नाही.

या सर्व समश्या संबधी दि.१६ मे रोजी नागपूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त मडावी,शासकीय कामगार अधिकारी गुणवंत पंधरे, कामगार अधिकारी आर आर काळे,के जे भगत,ए पी मुंजे यांनी कंपनीला भेट देऊन कामगारांच्या समश्या जाणून घेतल्या त्या प्रसंगी कामगारांनी त्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडण्यात आल्या होत्या.काळ लोटून गेला परंतु कामगारांना त्यांचा हक्क मिळणार की नाही ही शंका वर्तविल्या जात असतांना काही कामगारांना व्यवस्थापनाने खोटे प्रलोभने देऊन कामगारात फूट पाडण्याचा देखील प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली.

काही महिन्यांपासून कंपनीने विजेचे बिल न भरल्यामुळे कंपनीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असल्याने काही दिवसांपासून कंपनीचे उत्पादन बंद होते.व्यवस्थापन कंपनी बंद करण्याचा कट तर रचत नाही ना असी कामगारांना शंका उत्पन्न व्हायला लागली असल्याने त्यांनी आपला व्यवस्थापणाविरुद्ध चा लढा कायम ठेवला .अखेर कंपनीला नमते घ्यावेच लागले.दि.१७ जुलै ला झालेल्या बैठकीत कामगारांच्या विविध मागण्या संबंधित समझोता करार झाला असल्याने तूर्तास का होईना परंतु कामगारांना दिलासा मिळाला आहे.

संदीप बलविर