Published On : Wed, Jul 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा विदर्भ–मराठवाड्यात फटका; उगवण अपयशी, १८ कंपन्यांविरोधात कारवाई

Advertisement

मुंबई : खरीप हंगामात विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे. पेरणीनंतर अपेक्षित उगवण न झाल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून, त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊन आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

राज्यातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, लातूर आणि धाराशिव या दहा जिल्ह्यांतून कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेषतः अमरावती विभागातील मोर्शी, तिवसा, वरूड तसेच मराठवाड्यातील जालना आणि नांदेड भागात उगवण न झाल्याच्या सर्वाधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणाची गंभीर दखल घेत कृषी विभागाने १८ बियाणे उत्पादक कंपन्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १८१ न्यायालयीन प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. संशयित बियाण्यांचे नमुने आणि साठे जप्त करण्यात आले असून काही कंपन्यांचे विक्री परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत तसेच मंत्रालयातील बैठकीत दोषी कंपन्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाला आवश्यक निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

निकृष्ट बियाण्यांमुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईबरोबरच बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.