Published On : Sat, May 12th, 2018

संताजी नगरच्या राजाला साऊंड सिस्टीम भेट

Advertisement

Sound System

कन्हान: शिव हनुमान मंदिर कांद्री अंतर्गत संताजी नगरचा राजा गणेशोत्सव मंडळाला सामाजिक भावनेतून आज (ता.१२) साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली.

Advertisement

कांद्री येथील सामाजिक कार्यकर्ते अनील गुप्ता व वामन देशमुख यांच्या विशेष सहयोगाने हि भेट मिळाली. यावेळी शिव हनुमान मंदिरात झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अनील गुप्ता, संताजी सभागृहाचे पदाधिकारी वामनराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, भुमिपूत्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल हजारे, संताजी नगरचा राजा मित्र परिवाराचे अध्यक्ष योगेश ठाकरे, मार्गदर्शक खिमेश बढिये, भजन मंडळाचे सदस्य गजानन वडे, मुकुंद उंबजकर, गणेश शर्मा, विक्की कुंभलकर, मनोज वडे, बाबा यादव, रमेश सिंग, रितेश मेश्राम, प्रचिती बढिये, ओम हजारे, हजारे, चिंतामण सार्वे यासह संताजी नगर चा राजा मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.