Published On : Fri, May 17th, 2019

लवकरच धावणार मेमू

स्लग -रेल्वे बोर्डाला ला प्रस्ताव सादर

नागपूर: कमी अंतरासाठी मेमू चालविण्याचा विचार सुरू आहे. महाव्यवस्थापक कार्यालयाकडून मेमूशेडसाठी रेल्वे बोर्डाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच महामेट्रोने कोचेस उपलब्ध करून दिल्यास ब्राडगेज मेट्रोसेवा सुरू केली जाईल, असेही ते म्हणाले. मध्य रेल्वे अंतर्गत मुंबई, भुसावळ, सोलापूर, पुणे आणि नागपूर यापैकी मेमू कुठेच नाही. नागपूरचे महत्व लक्षात घेता लवकरच मेमू नागपुरात धावेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
डी. के. शर्मा यांनी गुरुवारी अजनी लोकोशेडला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अजनी लोकोशेड भारतातील सर्वोत्कृष्ट शेड ठरले आहे. या ठिकाणी पुशपूल तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. येथील इंजिन घाटसेक्शनमध्ये अधिक उपयुक्त ठरत आहे. लोणावळा घाट सेक्शनमधून धावणाºया गाड्यांना हे इंजिन जोडण्यात येत असल्याने रेल्वेगाड्यांचा सरासरी वेग वाढून वेळेची बचत होऊ लागली आहे. नागपूर – पुणे, नागपूर – नाशिक गाड्यांना येथील इंजिन जोडले जात आहे. येणाºया दिवसांमध्ये अन्य गाड्यांनासुद्धा येथील इंजिन जोडले जाणार आहे.
भारतीय रेल्वेने पायाभूत विकासावर भर दिला असून तिसºया आणि चौथ्या रेल्वे मार्गाची कामे सुरू आहेत, आॅटोमॅटीक सिग्नलींग, लूपलाईनच्या संख्येत वाढ होत आहे. प्रवासी सुविधासुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गेल्या ४० वर्षांमध्ये झाली नाहीत तेवढी विकासकामे अलिकडच्या वर्षांमध्ये झाली असल्याचा दावा त्यांनी केला. स्वयंचलित जिने, लिफ्ट, एफओबीची कामे जोरावर सुरू आहेत. प्रवासी सुविधांवर गेल्या वर्षी ३०० कोटींचा खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली.सेवाग्राम व इटारसी रेल्वेमार्गच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी डबे वाढविण्यापेक्षा हॉलीडे स्पेशल चालविण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले.

तर गोव्यासाठी ट्रेन पुन्हा सुरू होणार
पर्यटनासाठी गोवा प्रसिध्द आहे. मात्र, नागपुरहून गोव्यासाठी थेट रेल्वे नाही. पुरेसे प्रवासी मिळाल्यास गोवा ट्रेन पुन्हा सुरू होऊ शकते, अशी माहिती महाव्यवस्थापक होणार, डी.के. शर्मा यांनी दिली. मध्यंतरी जेटने गोव्यासाठी विमानसेवा सुरू केली होती तीही आता बंद झाली. मागील वर्षी उन्हाळ्यात मध्य रेल्वेतर्फे नागपूरवरून गोव्यासाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यंदा तर त्याही सोडल्या नाहीत. आज गोव्याला रेल्वेने जायचे तर पुणे किंवा मग व्हाया मुंबई जावे लागते. त्यामुळे थेट गाडी सुरू का करीत नाही असे विचारले असता, त्यावर विचार करण्यात येईल, असे शर्मा म्हणाले.

अजनी स्थानकाचा कायापालट
सागरमाला प्रकल्पांतर्गत अजनीत मल्टीमॉडल हब विकसित केले जात आहे. या शिवाय रेल्वेकडूनही फलाट व पीटलाईनच्या संख्येत वाढ, वॉशींग लाईनसह अन्य कामे केली जाणार आहे. येणाºया दिवसांमध्ये सॅटेलाईन टर्मिन्स स्वरूपात विकास प्रस्तावित असलेल्या अजनी स्थानकाचा कायापालट होणार आहे. लवकरच अजनी स्थानकाहून अजनी – काझीपेठ पॅसेंजर सुरू होईल. लोकोशेड बध्दल ते म्हणाले अजनी लोको शेड भाारतातील सर्वाकृष्ठ म्हणून गणल्या जाते.