कामठी:- स्थानिक छावणी परिषद कामठी परिसरातील बंगला क्रमांक 23 अ माल रोड चा ताबा घेण्यासाठी दोन गटात हाणामारी झाल्या वरून दोन्ही गटाच्या तक्रारीवरुन दोन्ही गटा विरोधात जुनी कामठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता मात्र जुनी कामठी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत पोलिस उपायुक्त निलोत्पल यांनी दिलेल्या आदेशावरून सदर गुन्हा प्रकरण नवीन कामठी पोलीस स्टेशन ला वर्ग करण्यात आले होते यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनार्थ दुययम पोलीस निरीक्षक आर आर पाल यांनी पोलीस पथकासह आज या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू पिल्ले यांच्या पुराना गोदाम येथील घरची झडती घेतली असता आरोपी घरात मिळून आला नाही मात्र घरातून एक लोखंडी तलवार, एक फरसा, एक कोयता, एक बोथळ असे चार धारदार शस्त्र अंदाजे किमती 1500 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहन क्र एम एच 40 बी जे 1616 किमती 7 लक्ष रुपये असा एकूण 7 लक्ष 1500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बंगला इकबाल सिंह बेदी यांच्या नावावर असून नातू पवणीत सिंह बेदी हा दर महिन्याला भाडा घेऊन जात होता यांचा कन्टोनमेंट कामठी परिसरातील माल रोडवरील 23 अ हा बंगला त्यांनी काही वर्षापूर्वी विकास विश्वनाथ गोयल वय 42 यांना मागील 35 वर्षांपासून भाड्याने दिला असून विकास गोयल हे आपल्या कुटुंबासह बंगल्यात राहात असतात काल गुरुवार सकाळी आठ वाजता सुमारास सोनू तंबी पिल्ले वय 37 राहणार पुराना गोदाम हा आपल्या वीस सहकार्यांसोबत बंगला क्रमांक 23 येथे जाऊन मी हा बंगला मनी बेदी यांचेकडून विकत घेतला असून मी माझ्या सामान आणला असून मी हा सामान या बंगल्यात ठेवत असल्याचे सांगून विकास विश्वनाथ गोयल यांच्यासोबत वाद घालून भांडणाला सुरुवात केली
सोनू पिल्लू च्या सहकाऱ्यांनी हॉकी स्टिक ,लाकडी दांड्याने विकास गोयल ,त्याचा लहान भाऊ अमित गोयल, गौरव बुटांनी, विक्रय अभिकर्ता संजय जंजाळ यांना मारझोड करून विकास गोयाल यांच्या गळ्यातील सोन्याचे गोप व बोटातील सोन्याची अंगठी त्याचा भाऊ अमित गोयल च्या बोटातील सोन्या अंगठी एकूण 60 हजार रुपयांचा माल बळजबरीने काढून मारझोड केली त्यावेळी परिसरात मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती विकास गोयल यांनी जुनी कामठी पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार केली असता पोलिसांनी कलम 395 452 नुसार गुन्हा दाखल केला आहे तर सोनू पिल्ले यांनी ऑगस्ट 2019 मध्ये पवणीत सिंह (मनी)बेदी सोबत बंगला विकत घेण्याची गोष्ट झाली असून बंगला दुरुस्त करून स्वतःचे सामान सुद्धा शिफ्ट केले आहे
तर विधिवत पद्धतीने वास्तपूजन धार्मिक कार्यक्रम न केल्यामुळे राहायला गेले नव्हते मात्र गैरअर्जदार विकास गोयल यांनी बंगल्याचाकुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करून बंगल्यातील साहित्य फेकून दिले याबाबत सोनू पिल्ले यांनी विचारणा केली असता विकास गोयल व सहकाऱ्यांनी मारझोड केली यावरून सोनऊ पिल्ले यांनी जुनि कामठी पोलीस स्टेशन गाठून विकास गोयल, अमित गोयल ,गौरव बूटाणी, विपिन अग्रवाल व संजय जंजाळ यांनी लाकडी दंडाने मारझोड केल्याची तक्रार जुनी कामठी पोलिस स्टेशनला केली असता पोलिसांनी कलम 323, 143 ,452 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार देविदास कठाळे हे करीत असताना डीसीपी निलोत्पल च्या आदेशानुसार सदर प्रकरण हे जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत असूनही नवीन कामठी पोलिस स्टेशन ला वर्ग करण्यात आल्याने डीसीपी निलोत्पल यांचा जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या कारभारावर शंका कुशंका दिसून येते…
संदीप कांबळे कामठी