Published On : Sat, Mar 14th, 2020

ग्रामीण भागातील कुपोषण मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोषण अभियान लोकचळवळ म्हणून राबवावी -सभापती उमेश रडके

Advertisement

कामठी :-, ग्रामीण भागातील कुपोषण मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोषण अभियान लोकचळवळ म्हणून राबविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजने अंतर्गत पोषण अभियान जनजागृती रॅलीला हिरवा ध्वज दाखवता प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कामठी ग्रामीण पोषण अभियान जनजागृती रॅली ची सुरुवात कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून करण्यात आले यावेळी , पंचायत समिती सदस्य वनीता जीतकार ,दिशा चणकापूरे, दिलीप बंजारी ,पूनम मालोदे ,शालु हटवार, सुमेध रंगारी, गटशिक्षण अधिकारी कश्यप सावरकर, जेष्ट विस्तार अधिकारी अरविंद आतुरकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, तालुका एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती मानकर ,सुजाता मुंडे ,माधुरी कोल्हे ,वैशाली खोत, साधना राऊत ,माधुरी रोकडे ,चंद्रकांत तोडकर ,सह अनेक अधिकारी ,अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते, पोषण अभियान जनजागृती रॅलीच्या माध्यमातून पोषण आहार,कुपोषण मुक्त करणे, बेटी बचाओ बेटी पाढाओ, ,बाल हत्या, हुंडाबळी, दारूबंदी, विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले, पोषण आहार जनजागृती अभियान रॅली जयस्तंभ चौक ,शुक्रवारी बाजार ,गोयल टाकी चौक ,मोटर स्टँड चौक, तहसील कार्यालय मार्गे नगर भ्रमण करीत रेल्वे स्टेशन मार्गे पंचायत समिती परिसरात समापन करण्यात आले कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मौखिक मार्गदर्शन करून कुपोषणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकानी सहकार्य करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती मानकर यांनी केले कार्यक्रमाचे संचालन सुजाता मुंडे यांनी केले व आभार प्रदर्शन वैशाली खोत यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या

संदीप कांबळे

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.