Published On : Sat, Dec 9th, 2017

सोनियाजीच्या वाढदिवसानिमित्य युवक कांग्रेस चे निःशुल्क गंगाजल वितरण

Advertisement


नागपूर: भारतीय जनता पक्षाने रामजन्मभूमी च्या नावाने केलेली दिशाभूल त्यांनी लोकांकडुन राममंन्दिरच्या नावाने विटा व गंगाजल चे शुल्क वसुल केले होते. नागपूर लोकसभा युवक कांग्रेसने जनचेतना यात्रा बाईक रैली नागपूर ते वाराणसी काढली होती वाराणसी वरुन आणलेले गंगाजल आज अखिल भारतीय कांग्रेस च्या अध्यक्षा त्यागमूर्ति सोनिया जी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्य नागपूर लोकसभा युवक कांग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या हस्ते तेलंगीपुरा आखाड़ा सिरसपेठ येथे निःशुल्क गंगाजल वितरण करण्यात आले. सुमारे ५०० नागरिकांना गंगाजल वितरण करण्यात आले. तेव्हा तेथील नागरिकांना भाजपाने राममंदिर च्या नावाने गंगाजल चे पैसे घेतल्याची आठवण झाली.

सिरसपेठ येथील नागरिकांनी जनतेसाठी व जनतेच्या प्रश्नावर सतत झटणारे बंटी शेळके यांनी काढलेल्या जनचेतना यात्रा बाईक रैलीचे भरभरून कौतुक केले. तसेच सोनियाजीच्या वाढदिवसानिमित्याने नागरिक शिबिर आयोजित करण्यात आले शिबिराचे उदघाट्न माजी खासदार गेव्हबाबू आवारी यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे विरोधीपक्ष नेता तानाजी वनवे होते. पैनकार्ड, आधार कार्ड, राशनकार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट बनविन्यात आले.

Gangajal
अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला, बंटी शेळके म्हणाले कि नागरिकांच्या समस्या त्यांच्या प्रश्नसाठी मी सदैव तत्पर आहो. परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. त्यांनी नागपूर लोकसभा युवक कांग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांचे आभार मानले या कार्यक्रमात आलोक कोंडापुरवार, राजेंद्र ठाकरे, वसीम शेख, अक्षय घाटोले, हेमंत कातुरे, सौरभ शेळके, शाहबाज खान चिस्ति, सागर चव्हाण, अतुल मेश्राम, पूजक मदने, देवेंद्र तुमाने, हर्षल धुर्वे, विलास डांगे, अभय रणदिवे, आशीष लोनारकर, कुणाल जोध, नकिल अहमद, मोनाली डोनेकर, माधुरी लांबट, उमा खोटे, सुलोचना राउत, बबिता फूलवारे, आदर्श वाशीमकर, कल्पना डोंगरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement