Published On : Tue, Jul 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सोनेगाव आमराईतील वृक्षतोडीवर उद्या जनसुनावणी; 61 की 200 झाडे? नागरिकांचा मनपाला सवाल

Advertisement

नागपूर: गेल्या महिन्यात “We लव्ह सोनेगाव आमराई ग्रुप” अंतर्गत जवळपास 650 स्थानिक तसेच वरिष्ठ नागरिकांनी (महिला व पुरुष) सोनेगाव आमराई तील 61 वृक्षांना वाचविण्यासाठी ” स्वाक्षरी अभियान” मध्ये भाग नोंदविला आणि ह्या वृक्षांना वाचविण्याचा संकल्प देखील केला होता. तसेच जवळपास 61 वरिष्ठ नागरिकांनी ह्या झाडांना मिठी मारत चिपको आंदोलन आणी महिलांनी राखी बांधून औक्षण देखील केले होते. नागपूर महानगर पालिके ने सोनेगाव आमराई जंगलातील जवळपास 61 वृक्ष (3 ऐतिहासिक व 58 इतर) तोडण्यासाठी उद्यान विभागामार्फत नोटीस जारी केली होती. त्या नोटीसी च्या प्रस्तावाला विरोध तरुण तुर्क आणि पर्यावरणवादी संघटना तर करीत आहेतच पण आता अनुभवी अर्क ( 650 वरिष्ठ व स्थानिक नागरिक ) देखील मैदानात उतरले आहे.

सोनेगाव आमराई चे जंगल (ओल्ड एअरपोर्ट रोड अर्थात जुना सोनेगाव विमानतळ रस्ता च्या आजूबाजूचे भोसले कालीन घनदाट जंगल), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर् विधान सभा क्षेत्रातील हा भाग ह्या सर्व नागरिकांसाठी कित्येक वर्षांपासून सर्वात फेव्हरेट मॉर्निग वॉक रोड आहे.

ह्या भागात नियमित रूपाने फिरायला येणाऱे हे नागरिक म्हणतात वृक्ष तोडण्याच्या ह्या बाबतीत मनपा ला घाई किती आहे बघा. आक्षेप आणि जन सुनावणी च्या आधीच कंत्राट दराने पाईप आणून बाजूला स्टोर करून ठेवले आहेत. ह्या संबंधी ची जनसुनावणी उद्या …बुधवारी , मनपा आयुक्त (वृक्षा अधिकारी) ह्यांचे कार्यलयात दुपारी 12.30 वाजता होणार आहे.

ह्या सर्व पर्यावरणवादी महिला व पुरुष वरिष्ठ नागरिकांनी ह्या वृक्ष कटाईचा विरोध दर्शवीत मनपा ने ह्या मलवाहिनीचा मार्ग बदलावा आणि मलवहिनी बाजूच्या नाल्यातून (पोहरा नदीतून) टाकवी जेणेकरून झाडांना काही होणार नही अशी एकमुखाने मागणी केली आहे आणि समस्त नागरिकांना उद्या जनसुनावणी साठी हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

काही वरिष्ठ नागरिक जे पक्षी प्रेमी आहेत ते म्हणतात ह्या भागात नीर निराळे पक्षी , स्थलातरीत पक्षी तसेच मोरांचे नियमित दर्शन होते. ही बृक्ष कटाई त्या पक्ष्यांना देखील प्रभावित करेल. तेव्हा मनपा ना निर्णयाचा फेरवीचार करावा आणि प्रस्तावाला रद्द करण्याचा निर्णय घ्यावा.*
काही राष्ट्रीय वृत्तापत्र मध्ये आलेल्या बातमीानुसार ह्या 61 वृक्ष च्या गणने मध्ये देखील विसंगती आहे. ही 61 झाडे फक्त मशीनरी हलविण्यासाठी तोंडावी लागणार आहे. तसे वास्तविक पाहिले असता जवळपास 146 झाडे ह्या मध्ये बाधित होणार आहे. काही वरिष्ठ नागरिक जे ह्या भागात नियमित येतात त्यांच्या अनुसार जवळपास 200 च्या वर झाडे तोडण्याचा महानगर पालिकेचा मानस आहे.

तसे पाहिले असता नागपूर महानगर पालिकेच्या मनपा नोटीस (13 मे) प्रमाणे सहकार नगर घाट ते मुळीक कॉम्प्लेक्स येथील भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या जागेतून (आमराई जंगल चा भाग) मलवाहीका टाकण्याच्या बांधकामात् आणि खोदकामात ही 61 वृक्ष अडथळा निर्माण करीत आहेत . ज्यात बाभूळ,हिवार ,काट सावर ,महारुख ,बोराची झाडे आडजात , सुबाभूळ, कडुलिंब , चिंच बिलाई , करंज , अशोका , बेल निलगिरी , पळस , जांभूळ आणि वडाचे झाड (मनपा नोटीसेप्रमाणे ह्या पैकी फक्त 3:हेरिटेज आणि 58 नॉन हेरिटेज झाडे आहेत.)

वरिष्ठ नागरिक जे ह्या भागात आटपर्यंत जाऊन आले ते म्हणतात फक्त 61 नाही तर ह्या प्रोजेक्त अंतर्गत जवळपास 200 च्या वर झाडांची कत्तल होईल. वरिष्ठ नागरिक म्हणतात जर सकारात्मक निर्णय उद्याच्या जनसुनावणी मध्ये आला नाही आणि सोनेगाव् आमराई च्या झाडांना वाचविण्याचा विचार करण्यात आला नाही तर भर पावसाळ्यात ह्या संदर्भात ” उपोषणा” चा मार्ग अवलंबविण्यात येईल.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.