Published On : Mon, Aug 28th, 2017

गुरमीत राम रहीमचे मुलीसोबतच होते अनैतिक संबंध; जावयाकडूनच खळबळजनक आरोप

Ram Rahim
रोहतक:
आश्रमातील दोन महिला अनुयायींवरील बलात्कार प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला सीबीआय कोर्टाने आज (सोमवारी) 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी त्याला कोर्टाने या प्रकरणी दोषी ठरवले होते.

दुसरीकडे, राम रहीमबाबत त्याच्या जावयाने धक्कादायक खुलासा केला आहे. पत्नी आणि बाबाचे अनैतिक संबंध असल्याचे विश्वास गुप्ता याने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते. बाबाच्या विरोधात त्याने 2011 मध्ये कोर्टात धाव घेतली होती.

मानलेल्या मुलीसोबत बाबाचे होते अनैतिक संबंध…
बाबा राम रहीम याचे मानलेल्या मुलीसोबत अनैतिक संबंध होते, असा आरोप त्याच्या जावयाने केला आहे. ‘बाबा रात्री हॉटेल थांबत होता तेव्हा माझी पत्नी त्याच्यासोबत रुममध्ये एकटी राहात होती. मला मात्र, शेजारच्या खोलीमध्ये पाठवले जात होते’, असा खळबळजनक तितकाच धक्कादायक खुलासा बाबांची मानलेली मुलगी हनीप्रीतचा पती विश्वास गुप्ता याने केला आहे.

Advertisement

विश्वास गुप्ता याने आरोप केला की, बाबाचे आणि हनीप्रीतचे पहिल्यापासून अनैतिक संबंध होते. हे पाप लपवण्यासाठी त्यांनी सर्वांसमक्ष तिला आपली मुलगी मानले होते. विश्वास गुप्ता यांनी 2011 मध्ये एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेला इंटरव्ह्यूमध्ये हे आरोप केले होते. नंतर गुप्ता यांनी बाबाच्या विरोधात कोर्टात धावही घेतली होती. सध्या तो व्हिडिओही व्हायरल होत आहे.

दरम्यान, 1996 मध्ये बाबाने हनीप्रीत हिचे विश्वास गुप्ता याच्याशी लग्न लाऊन दिले होते. नंतर तिला सर्वांसमक्ष आपली मुलगी मानले होते. परंतु, हॉटेलमध्ये तसेच गुहेमध्ये दोघांना अनेकदा एकत्र पाहिल्याचे विश्वास याने इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement