Published On : Tue, Jan 28th, 2020

स्वयंम’च्या निःशुल्क शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

नागपूर: स्वयंम्‌ फाऊंडेशन व ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनच्या जनसंवाद मार्गदर्शन शिबिर उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात रोजगाराबाबत विविध शासकीय योजना, ऑनलाईन अर्जाची पद्धत यावर तरुणाईला मार्गदर्शन करण्यात आले.

स्वयंम्‌ फाऊंडेशन व ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनच्या सहकार्याने मुक्तांगण महिला बहुद्देशीय संस्थेतर्फे सोमलवाडा येथील एकता दुर्गा उत्सव मंडळ मैदानावर आयोजित शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना, असे आवाहन केले आहे. याच संकल्पनेवर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेविका जयश्री वाडीभस्मे यांनी शिबिराचे उद्‌घाटन केले. यावेळी नगरसेवक अविनाश ठाकरे, नयना झाडे उपस्थित होत्या.

यावेळी प्रमुख समन्वयक अनिल चौहान, मार्गदर्शक चारुदत्त बोकारे, प्रकल्प समन्वयक राजेश पुरोहित, प्रकल्प संचालक अजित पारसे, श्रृती देशपांडे एक खिडकी मार्गदर्शन सेवेविषयी माहिती दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुक्तांगण महिला बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा टिपले, सचिव नंदीनी करंभे, उपाध्यक्ष मिना बालेकर, उपसचिव जोत्सना कापगते, सदस्या उमा मालवीय आदींनी परिश्रम घेतले.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून शिबिराचा उपक्रम सुरु झाला आहे. शासकीय योजनेद्वारे उद्योगांना चालना देण्याच्या हेतूने उपयुक्त माहिती नागरिकांना देण्यात येईल .

राष्ट्राच्या प्रगतीसाठी सोशल मिडिया, शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी या वर्षभर कायम स्वरूपी चालणाऱ्या शिबीर आणि उपक्रमात सहभागी व्हावे.
– अजित पारसे, प्रकल्प संचालक.