Published On : Mon, Jun 29th, 2020

मातीमिश्रित कचऱ्याच्या गाडीला यादीतून वगळण्यात येते – आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे डम्पिंग यार्ड मध्ये मातीमिश्रित कचरा गाडी खाली करण्यात येत असल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी लावला आहे.

आरोग्य विभागाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, कचरा गाडीची दोनदा तपासणी केली जाते. एकदा वजन काट्यावर आणि दुसऱ्या वेळेस डम्पिग यार्डच्या आत गाडी तपासली जाते. वजन काट्यावर वजन केल्यानंतर ही गाडी यार्डमध्ये जाते. तिथे उपद्रव शोध पथकच्या कर्मचाऱ्यांतर्फे गाडीची तपासणी करण्यात येते. तिथे जर त्यांना कचऱ्यासोबत माती आढळली तर ते वजन काट्यावर कार्यरत मनपा कर्मचाऱ्यांना माहिती देतात.

या माहितीच्या आधारे संबंधित कचरा गाडीचा क्रमांक आणि वजन यादीमधून काढण्यात येतो. आतापर्यंत ५९ गाड्यांचे क्रमांक काढण्यात आले आहे. तरी या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यावर चौकशी केली जाईल, असे ही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.