नागपूर : शहरात सायबर चोरट्यांचे जाळे पसरले आहे. आतापर्यंत अनेकांची फसवणूक करण्याच्या घटना समोर येत आहे. प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आयटी कंपनीमध्ये सॉफ्टवेअरचे काम करणाऱ्या युवकाची सायबर चोरट्याने सहा लाख १६ हजाराने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
विक्रांत दिलीप निनावे (वय २९, रा. पांडे ले आऊट) असे सॉफ्टवेअर इंजिनियरचे नाव असून त्याने यासंर्दभात पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रांत घरी असताना, त्याच्या मोबाईलवर १८ एप्रिलला प्रिती नावाच्या महिलेने ८९६५०५८५५० या क्रमांकावरुन व्हाटसअॅप कॉल केला.
तिने स्वतःचे नाव ए.आर. प्रिती आहे असे सांगून त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून कंपनीबाबत माहिती करून घ्या असे सांगीतले. यावेळी विक्रांतने लिंक ओपन केली असता त्याच्या बॅकेच्या खात्यातून वेळोवेळी एकुण ६ लाख १६ हजार रूपये ऑनलाइन डेबीट करून घेतले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून आरोपीचा छडा लावण्यास सुरुवात केली आहे.