Published On : Mon, Dec 5th, 2022

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नागपूर तर्फे “जागतिक दिव्यांग दिनानिमित्य” विविध कार्यक्रमाचे आयोजन

Advertisement

नागपूर : समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर यांचे अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील अनुदानित, विना अनुदानित आणि कायम विनाअनुदानित दिव्यांग शाळा व कर्मशाळा यांचे संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर २०२२ रोजी “जागतिक दिव्यांग दिनानिमित्य” भव्य रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ हा “समता पर्व” म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर यांनी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिनांक ०३.१२.२०२२ ते ०४.१२.२०२२ पर्यंत दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी तसेच समाज कल्याण विभाग अंतर्गत कार्यरत विशेष शाळां व कर्मशाळामध्ये कार्यरत कर्मचारी यांचेमधील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.

दरवर्षी या विभागाकडून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो परंतु, यावेळच्या सोहळ्यात दिव्यांग विद्यार्थ्यावर वर्षभर मेहनत घेणा-या कर्मचा-यांनाही लक्षात ठेऊन विभागाने कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. आज दिनांक ३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता गांधीबाग उद्यान ते चिटणीसपार्क महाल या मार्गावर ४ किमी पायी दिव्यांग रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांचे अधिनस्त असलेल्या सर्व दिव्यांग शाळा व कार्मशाळेतील विद्यार्थी, कर्मचारी आणि सामाजिक संघटना यांचा सहभाग असेल. रॅलीचे उद्घाटन जिल्हा परिषद नागपूरच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मा. श्रीम. मुक्ताताई कोकडडे यांच्या हस्ते मा. श्रीम. सौम्या शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले.

या भव्य रॅलीत सहभागी असलेल्या दिव्यांग विद्यार्थी, कर्मचारी आणि सामाजिक संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी मा. डॉ. कमलकिशोर फुटाणे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर, मा. डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, नागपूर, मा. श्री. दयाशंकर तिवारी, माजी महापौर, श्री. किशोर मा. भोयर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. नागपूर आणि सहभागी दिव्यांग शाळा व कर्मशाळा यांचे संस्थासंचालक प्रामुख्याने उपस्थित झाले होते.

तत्पूर्वी, गांधीबाग येथून रॅलीला मा. अध्यक्षा जि.प. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर यांनी हिरवी झेंडी देऊन प्रारंभ केला. तसेच त्यांनी दिव्यांग मुलांसोबत १ किमी अंतर पायी चालत सहभाग घेतला. या रॅलीला अधिक आकर्षित करण्यासाठी या वर्षी उंट, घोडे, बँड पथक तसेच शालेय विद्यार्थ्यांचे महापुरुषांच्या प्रतिकृतात्मक वेशभूषेत विद्यार्थी यांचा समावेश करण्यात आला ज्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, पंडित नेहरू, सुभाष चंद्र बोस, स्वातंत्रवीर वी.दा. सावरकर, इत्यादींचा समावेश करण्यात आलेला होता. रॅलीचा समारोप चिटणीस पार्क येथे सहभागी विद्यार्थ्यांना नास्ता वाटप करून करण्यात आला. यावेळी डॉ. कमलकिशोर फुटाणे, डॉ. सिद्धार्थ गायकवाड आणि श्री. किशोर मा. भोयर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यासोबत संवाद साधत विभागाकडून तयार केलेल्या नाश्त्याचा आस्वाद घेतला.

त्यानंतर ११.०० वाजता शिक्षक सहकारी बँक, सभागृह गांधीसागर तलाव नागपूर येथे जिल्ह्यात कार्यरत शाळा/कर्मशाळा यांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांचे सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहिले. त्यामुळे महिला सक्षमीकरनाची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. आपल्या शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतांना नव्याने मुख्य कार्यकारी पदी आलेल्या श्रीमती सौम्या शर्मा यांनी दिव्यांग रॅलीत लिहिलेल्या ओळींचे स्मरण आपल्या भाषणात आवर्जून केले. “दिव्यांगाना दया नको संधी द्या, सहानुभूती नको साथ द्या” या घोषवाक्याचे विशेष करून कौतुक केले आणि आगामी काळात जिल्हा परिषद नागपूर कडून या घोषवाक्याशी निगडीत कामे केली जातील असा विश्वास उपस्थित दिव्यांग व्यक्तीना दिला. सोबत येत्या काळात जिल्हा परिषद प्रशासन ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करणारे अॅप विकसित करून कार्यान्वित करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. या भव्य रॅलीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांच्या अंतर्गत येत असलेल्या ७५ शाळा व कर्मशाळांचा सहभाग होता हे विशेष !

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती मुक्ताताई कोकडडे यांनी ग्रामीण जिल्हा प्रशासन दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करण्यास तत्पर असल्याचे सांगून योजनांची अंबलबजावणी तळागळात करण्यासाठी लक्ष पुरविणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मीनल सांगोळे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ, कमलकिशोर फुटाणे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प, नागपूर यांनी केले. आपले प्रास्ताविक करतांना त्यांनी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर यांचे मार्फत राबविण्यात आलेल्या योजनांची विशेष माहिती दिली. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी केले. आपले आभार व्यक्त करतांना त्यांनी विशेष करून दिव्यांग क्षेत्रात नागपूर शहरातून राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय साहित्य व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नागपूर येथील अनेक दिव्यांग व्यक्तींचे उदाहरण दिले आणि रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमाचा राजकीय वारसा उलघडला.

दिव्यांग विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कलाकृतीचे प्रदर्शन पाहण्यासाठी श्री. मिलिंद सुटे, सभापती समाज कल्याण समिती हे प्रामुख्याने उपस्थित होते. याच कार्यक्रमात “जागतील दिव्यांग दिनी” ज्या दिव्यांग व्यक्तींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपले जिद्दी आणि चिकाटीने शासकीय नौकरी मिळविली त्या व्यक्तींचा ज्यामध्ये श्री. तेजस मेश्राम, श्री. विलास पोफळे आणि श्री. संतोष फड या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांचा शॉल, श्रीफळ सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर दिव्यांग क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तींचाहि विशेष सत्कार करण्यात आला ज्यामध्ये श्री. प्रफुल शिंदे, सी.आर.सी नागपूर आणि श्री. लहानुजी इंगळे मंगलदीप बंड पार्टी यांचा समावेश होता.

दिव्यांग दिनाच्या यशस्वीयतेसाठी श्री. किशोर भोयर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यानी जातीने लक्ष ठेवून नियोजन केले. कार्यक्रमासाठी विविध समित्यांचे गठन करून प्रत्येक समित्यावर जबाबदारी निश्चित केली. परिणामी आज यशस्वी कार्यक्रमाने दिव्यांगाना प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी श्री. प्रल्हाद लांडे व श्री. प्रवीण मोंढे श्री. उमेश वारजुरकर यांच्या मार्गदर्शनात श्री. संजय लुगे, श्री.राजेश भामकर, श्री.संजय रोकडे, श्री. लोकेश चोले, क्षीरसागर मॅडम, पिल्ले मॅडम, रत्ना कराळे मॅडम, सुनंदा गोडबोले मॅडम, प्रमिला गजभिये मॅडम, श्री. शमसुद्दीन अन्सारी, श्री. मंगेश मुसळे, श्री. मारोती भोयर, श्री. रंजन उपासे, श्री. जितेंद्र पाटील, श्री. सुनील बावणे,श्री. दीपक छापेकर श्री. प्रशांत अहिरकर व अनेक विशेष शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.