प्रभावी माध्यम याबाबत ऑनलाईन वेबीनार
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा या कार्यालयामार्फत 23 जून रोजी सकाळी 12 ते 1.30 वाजेपर्यंत महिला बचत गट हे महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे प्रभावी माध्यम याबाबत ऑनलाईन वेबीनार आयोजित केले आहे.
या वेबीनारमध्ये जास्तीत-जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र.ग.हरडे यांनी केले आहे.
या वेबीनारमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा जिल्हा समन्वय अधिकारी प्रदिप काठोळे हे महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे प्रभावी माध्यम या विषयावर समुपदेशन करणार आहे. या वेबीनारमध्ये गरजू युवक-युवतींनी सहभागी होण्याकरीता गुगल मिट या ॲपचा उपयोग करावा.
सदर वेबीनारमध्ये सहभागी होण्याकरीता https://meet.google.com/ejo-sfrj-ghv या लिंकचा वापर करून सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांच्याशी दुरध्वनी क्रमांक 07184-252250 येथे संपर्क साधावा.
83 वर्षाच्या आजीने लसीसाठी केले गावकऱ्यांना प्रोत्साहित
लस घेण्यासाठी गावातील कोणीही पुढे येत नसतांना 83 वर्षीय अनुसया मेश्राम या आजीने स्वत:हून पुढे येऊन लस घेतली आणि त्या पाठोपाठ गावातील अनेक नागरिक लस घेण्यासाठी सरसावले. गावकऱ्यांना प्रोत्साहित करणारी ही आजीबाई प्राथमिक आरोग्य केंद्र वरठी अंतर्गत येणाऱ्या टाकळी येथील आहे.
जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील कमी लसीकरण असलेल्या गावात आज आणि उद्या विशेष लसीकरण मोहिम राबविली जात आहे. आज टाकळी येथील केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत एकही व्यक्ती लसीकरणासाठी येत नव्हता ही बाब लक्षात घेता 83 वर्षीय अनुसया हिरामन मेश्राम यांनी स्वत:हून पुढे येऊन लस घेतली त्यानंतर गावकरीही लसीसाठी केंद्रावर आले.
आजीबाईंनी लस घेतली आपण का नाही घ्यायची ही भावना झाल्यामुळे नागरिकही लसीसाठी केंद्रावर आले. अनुसया आजीने लस घेतली त्यावेळी सरपंच तनुजा ईश्वरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके लसीकरण केंद्रात उपस्थित होते. नागरिकांनी आजीबाईचा आदर्श घेऊन लस घेण्यासाठी स्वत:हून केंद्रात यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
