Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Jun 21st, 2020

  .तर अधिकृत एजंटचा परवाना धोक्यात?

  अ‍ॅपव्दारे तिकीट बुकींगचा प्रवाशांना पर्याय?
  – काळाबाजारीवर नियंत्रणासाठी उपाय


  नागपूर: ऑनलाईन रेल्वे तिकीटांचा काळाबाजारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी देशभरात धाडसत्राची मोहीमच राबविण्यात आली. कार्यालय, प्रतिष्ठानावर धाडी मारून लाखो रुपयांच्या तिकीटा आणि साहित्य जप्त करण्यात आले. अधिकृत एजंट असल्यानंतरही बनावट आयडीवरून तिकीटांचा काळाबाजार केला जातो. असेच सुरू राहील्यास भविष्यात अधिकृत तिकीट एजंटचा परवाना धोक्यात येणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

  रेल्वे तिकीटांच्या काळाबाजारवर रेल्वे बोर्ड आणि आयआरसीटीसी गांभीर्याने विचार करीत आहे. यावर इंडियन रेल्वे कॅटरींग अ‍ॅण्ड टुरीझम कॉरपोरेशन (आयआरसीटीसी) पर्याय शोधणार आहे. उपाय योजनेअंतर्गत प्रवाशांना त्यांच्या अ‍ॅपद्वारे तिकीट बुकींगची सुविधा देण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

  काही महिन्याआधी आरपीएफने देशभरात मोहीम राबवून तिकीट काळाबाजार करणाèया रॅकेटचा भंडाफोड केला होता. याघटनेमुळे देशभरात प्रचंड खळबळ उडाली होती. तपासात अधिकृत एजंट विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून तात्काळ तिकीट काही मिनिटांतच बुक करून घेतात. नंतर त्या तिकीटांचा काळाबाजार केला जातो. चौकशीत पुढे आले की, तात्काळ तिकीट रॅकेटचे संबंध दूरपर्यंत असल्याची माहिती पुढे आली आहे. यानंतर रेल्वे बोर्ड सतर्क झाले होते.

  ऑनलाईन तिकीटांचा काळाबाजार करणाèया अधिकृत दलालांवर आरपीएफने कारवाई केली आहे. अधिकृत दलाल ज्येष्ट गरिकांच्या कोट्यातून बनावट नाव आणि आधार कार्डच्या माध्यमातून तिकीट बुक करीत होते. तर जनरल कोट्यासाठी बनावट आयडी ‘रामबाणङ्क उपयाच आहे. यावर पर्यायी उपाय योजना शोधण्यासाठी तयारी सुरू असल्याचे कळते.

  ३१७ एजंट्स काळ्या यादीत
  मागील तीन वर्षांपासून आरपीएफ विशेष अभियानाअंतर्गत मोहीम राबवित आहे. देशभरात ३ हजाराहून अधिक छापामार कारवाई करण्यात आली. यात बेकायदेशीरपणे तिकीट बुक करणाèया ३१९ एजंट्सला अटक करण्यात आली. यातील ३१७ एजंट्सला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. शिवाय जप्त ई तिकीटही ब्लॉक करण्यात आले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145