Published On : Sun, Jun 21st, 2020

रामटेक येथे आंतरराष्ट्रीय योग दिन घरोघरी उत्साहात साजरा

Advertisement

रामटेक-निकोप शरीर व प्रसन्न मनासाठी योगाचा जागर महिला ,जेष्ठ,व नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संपूर्ण जगभरात शाळा महावीद्यालये, आणि विविध ठिकाणी योग दिवस साजरा करण्यात येतो.योगामुळे स्वस्थ व आरोग्यदायी जीवन जगता येते.अनेक आजार व रोगांपासून बचाव व सुरक्षा करता येते. त्यामुळे योगाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन लोक योगमय जीवन जगण्यासाठी पसंती देत आहेत.

जागतिक योग दिवसानिमित्त आज कोरोनामुळे योग दिवस घरोघरी साजरा करण्यात आला. योग हे शरीर स्वास्थ उत्तम ठेवण्याचे व रोगापासून लढण्याकरिता शक्ती प्रदान करणारे महत्वपूर्ण साधन आहे.

आरोग्य ही सर्वांत मोठी भेटवस्तू आहे,
संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे,
आणि ती केवळ योगामुळेच मिळते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने योग दिवस साजरा केला जातो. योगगुरू रामदेवबाबा यांनीही या उपक्रमाचे जोरदारपणे स्वागत केले व जागतिक योग दिवस साजरा केला जातो. दिवसेंदिवस नागरिकांमध्ये योगाविषयी जनजागृती वाढत आहे.धावपळीचे जीवन व फास्टफूड, रसायनयुक्त खाद्य पदार्थामुळे नवनवीन आजार उद्भवत आहेत.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग हा एक महत्वपूर्ण उपाय आहे. आजचे जग कोरोना या महामारी ने त्रासले आहे .मात्र ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली ते या आजारापासून लवकर बरे होतात . रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नियमित योग करणे गरजेचे आहे. कोरोना सारख्या महामारीमध्ये प्राणायाम सूर्यनमस्कार, अनुलोम-विलोम, कपालभाती, अशी सोपी आसणे सुद्धा महत्वाची आहेत.

योगामुळे शरीर निकोप राहते. मन शांत व प्रसन्न असते. प्रशासनाच्या आदेशानुसार , कोरोनासारख्या उद्भवलेल्या महाभयंकर महामारीमधे सोशल डिस्टनिंगचा फज्जा होऊ नये , कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने नागरिकांना घरच्या घरीच आपल्या कुटुंबासह योग दिन साजरा करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाच्या आदेशानुसार नागरिकांनी प्रशासनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी घरोघरी मोठया संख्येने आपल्या परिवारासह लहान मुलासह महिला तसेच जेष्ठांनी उत्साहात योगक्रिया करून निरोगी उत्तम जीवन, राष्ट्रीय शांती व एकतेचा संदेश दिला.