Published On : Mon, Nov 9th, 2020

स्लुईस व्हॉल्व ब्रेकडाऊन: ११०० मिमी व्यासाच्या स्लुईस व्हॉल्वची दुरुस्ती रविवारीच पूर्ण …..

दक्षिण-पश्चिम, पश्चिम नागपूरचा पाणीपुरवठा रविवारी राहिला बाधित

नागपूर: पेंच २ व पेंच ३ जलशुद्धीकरण केंद्रांत वारंवार झालेल्या ट्रीपिंगमुळे पांडे लेआऊट फीडर मेनवरील सेमिनरी हिल्स स्थित ११०० मिमी व्यासाच्या जुन्या पद्धतीच्या स्लुईस व्हॉल्वमध्ये अचानक रविवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे पांडे लेआऊट फीडर मेनवरून पाणीपुरवठा होणाऱ्या दक्षिण व पश्चिम नागपुरातील भागांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही, त्यासाठी नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.

Advertisement

येथे उल्लेखनीय आहे कि नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी येत्या दिवाळीच्या दिवसात नागरिकांची अडचण होऊ नये या उद्देशाने या ११०० मीटर व्यासाच्या व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे ठरविलेच होते. यासाठी सोमवार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ६ दरम्यान शटडाऊन घेण्याचेही ठरले होते. मात्र रविवारी हा व्हॉल्व आपोआपच नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीचे काम रविवारीच ताबडतोब हाती घेण्यात आले.

रविवार ८ नोव्हेंबर २०२० रोजी तंत्रज्ञांनी हा बिघाड दूर करून रविवारी पाणीपुरवठा सुरळीत राखण्यासाठी एअर व्हॉल्व रिलीज करणे, ई. सर्व शक्यता पडताळून पाहिल्या मात्र अखेरीस सोमवारचे ठरलेले शटडाऊन रविवारीच घेण्याचा व सर्वप्रथम ११०० मिमीचा हा मोठा व्हॉल्व दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुरुस्तीचे काम दुपारी १२ वाजता सुरु होऊन रात्री ९.४५ पर्यंत पूर्ण करण्यात आले. या दरम्यान पेंच २ व ३ जलशुद्धीकरण केंद्रांतून पंपिंग पूर्णतया बंद ठेवण्यात आले होते. १० तासांच्या या अवधीत ११०० मिमी व्यासाच्या व्हॉल्वच्या दुरुस्तीसोबतच १.५ किलो चा चेकनट बनवून व्हॉल्वमध्ये बसविण्याचे काम देखील पूर्ण करण्यात आले.

OCWच्या सुशांत सौरभ, कुशल अतकरे व चिनार जोशी यांच्या चमूने रजीथ पी.ए. व राजेश कालरा यांच्या नेतृत्वात व मनपा अधीक्षक अभियंत्री श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, व OCWचे मुख्य कार्यकारी अभियंता संजय रॉय यांच्या मार्गदर्शनात हे जिकीरीचे काम यशस्वीपणे पूर्ण करून सोमवार सकाळी पाणीपुरवठा सुरळीत केला.

या कामांमुळे रविवार सायंकाळी खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहिला: धरमपेठ झोन: रायफल लाईन, फुटाळा, राम नगर जलकुंभ, सेमिनरी हिल्स जलकुंभ (ESR & GSR), लक्ष्मी नगर झोन: प्रताप नगर जलकुंभ, खामला जलकुंभ, लक्ष्मी नगर जुने जलकुंभ, टाकळी सीम जलकुंभ, गायत्री नगर जलकुंभ, जयताळा जलकुंभ गांधीबाग झोन: किल्ला महाल जलकुंभ, सीताबर्डी फोर्ट १ व २ जलकुंभ

चिंचभुवन कमांड एरिया, गिट्टीखदान कमांड एरिया

अचानक निर्माण झालेल्या ह्या परिस्थिती मुळे नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत….

For any complaints about water supply please contact OCW Toll free number: 1800 266 9899 and for any query visit OCW Website @ : www.ocwindia.com

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement