नागपूर : नागपूरवरून नागभीडकडे वेगाने जाणाऱ्या कारने खासगी बसला समोर टक्कर दिल्याने मोठा अपघात घडला. या भीषण अपघातात चौघांचा जागीच, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नागभीड-नागपूर मार्गावरील कान्पा गावाजवळ घडली.
रोहन विजय राऊत (वय ३०), ऋषिकेश विजय राऊत (वय २८), गीता विजय राऊत (वय ५०), सुनीता रूपेश फेंडर (वय ४०), प्रभा शेखर सोनवणे (वय ३५, लाखनी जि. भंडारा) आणि यामिनी फेंडर (वय ९, रा. नागपूर ) अशी मृतांची नावे आहेत. मृतमध्ये तीन जण एकाच कुटुंबातील असून ते नागपुरातील चंदननगर, गांधी क्रीडा मैदान परिसरात राहणारे होते.
दरम्यान, पोलिसांनी खासगी बसचालक राजेंद्र लाकडू वैरकर याला ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी भेट दिली.
लिंक :