Published On : Thu, Nov 30th, 2017

सर कस्तुरचंद डागा पुण्यतिथी शताब्दी महोत्सव १६ डिसेंबरला


नागपूर: नागपूर शहराच्या विकासात मोठे योगदान असणारे सर कस्तुरचंद डागा यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त १६ डिसेंबर रोजी स्थानिक कस्तुरचंद पार्क येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीनिमित्ताने डागा परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ३०) महापौर नंदा जिचकार यांनी आढावा बैठक घेतली.

बैठकीला महापौर नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अश्विन मुदगल, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, भाजपच्या मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, उपायुक्त रवींद्र देवतळे, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, एस. व्ही. डागा, दिनेश राठी, विदर्भ इंड्रस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, अनिल मंत्री, हरिश राठी, व्हीआयएचे सचिव पंकज बक्शी, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, के. एस. चव्हाण, उपअभियंता एस. के. नंदनवार उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेतला. सदर कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रण पाठविण्यात आले असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली. माहेश्वरी समाजाच्या वतीने आणि विदर्भ इंडस्ट्रीयल असोशिएशनतर्फे स्वतंत्रपणे काढण्यात येणाऱ्या डिसेंबर महिन्याच्या स्मरणिका सर कस्तुरचंद डागा यांना समर्पित राहणार असून त्याचे प्रकाशन मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महापौरांनी दिली. कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात काही सूचना एस. व्ही. डागा, दिनेश राठी, विदर्भ इंड्रस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे यांनी केल्या. महापौर नंदा जिचकार यांनी त्या सूचनांचे स्वागत करीत संपूर्ण आयोजन डागा परिवाराच्या देखरेखीखाली अधिकाऱ्यांच्या समन्वयाने होईल, असे सांगितले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement