Published On : Thu, Oct 14th, 2021

सामूहिक झेंडागीत गायन व संविधान शिलालेखाचे लोकार्पण रविवारी

Advertisement

‘आझादी-७५’ च्या अनुषंगाने १२५ चौकात सामूहिक झेंडागीत गायन : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

नागपूर,: भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीच्या अनुषंगाने ‘आझादी ७५’ अंतर्गत रविवारी १७ ऑक्टोबर रोजी नागपूर शहरातील १२५ चौकांमध्ये ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा’ या गीताचे सामूहिक गायन होणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि झेंडा गीतचे रचियता श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांच्या १२५व्या जयंतीच्या त्रिवेणी पर्वावर नागपूर महानगरपालिका, खादी ग्रामोद्योग आयोग आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या देशभक्ती चेतविणाऱ्या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संविधान चौकामध्ये सामूहिक झेंडागीत गायनाचा मुख्य कार्यक्रम व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाच्या शिलालेखाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी (ता. १४) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव, मनपा अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, उपायुक्त विजय देशमुख, मनपा शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, खादी ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी आदी उपस्थित होते.

रविवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता शहरातील १२५ चौकामध्ये झेंडा गीतचे सामुहिक गायन होईल. मुख्य कार्यक्रम संविधान चौक येथे १०.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील, अशी माहिती यावेळी महापौरांनी दिली.

कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे भारतीय राष्ट्रध्वज देण्यात येणार आहे. एकाचवेळी सर्व ठिकाणी झेंडा गीत एकस्वरात गायले जाईल. अश्या प्रकारचा देशातला हा एकमेव कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी सुद्धा उपस्थित राहतील. या अभिनव कार्यक्रमाला लायन्स क्लब, नागविदर्भ चेम्बर ऑफ कामर्स, ताजाबाद ट्रस्ट, मैत्री परिवार, कैट, नागपूर चेम्बर ऑफ कामर्स लिमिटेड, तेजस्विनी महिला मंच, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, भारत विकास परिषद, विदर्भ सेवा समिती, पालीवाल सेवा मंडल, श्रध्दा बहुउददेशीय संस्था, निराला सोसायटी, गुप्ताजी समाज, अयोध्यावासी वैश्यनगर सभा, विप्र फाऊंडेशन, सीताबर्डी व्यापारी संघ, गुजराती समाज, शाहू समाज कल्याण सोसायटी, विदर्भ आप्टीकल असोसिएशन, गेहोई वैष्व समाज, सराफा बाजार असोसिएशन, खंडेलवाल समाज, देवता फाऊंडेशन, शिवहरे समाज, प्रयास ग्रीन संस्था, दोसर वैश्य महासभा, अग्रहरी वैश्य समाज, ब्राम्हण सेना, नागपूर जैन समाज, विश्व सिंधी सेवा संगम, आदिवासी विकास युवा महासंघ, मो.रफी मंच, सिंधी हिंदी विद्या समिती आदी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. शिक्षण ‍विभाग आणि क्रीडा विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

प्रचार गाडीचे लोकार्पण
नागपूर महानगरपालिकेच्या पुढाकाराने आयोजित सामूहिक झेंडागीत गायन कार्यक्रमामध्ये शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ नागपूरतर्फे प्रचार वाहन तयार करण्यात आली आहे. या प्रचार वाहनाचे लोकार्पणही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. या प्रचार वाहनामध्ये झेंडागीत वाजविण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या जवळच्या चौकामधील कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कार्यक्रमाला सर्वपक्षीय सहकार्य
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून शहरात होत असलेल्या सामूहिक झेंडागीत गायन कार्यक्रमाला सर्वपक्षांनी सहकार्य दर्शविले आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे चिटणीस पार्क येथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात आग्याराम देवी चौक येथे, शिवसेनेतर्फे प्रमोद मानमोडे यांच्या नेतृत्वात बैद्यनाथ चौक येथे तर भारतीय जनता पक्षातर्फे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात टिळक पुतळा चौक येथे सामूहिक झेंडागीत गायन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

या चौकात होणार सामूहिक झेंडागीत गायन
टेलिफोन एक्सचेंज्‍ चौक, डिप्टी सिग्नल चौक, लता मंगेशकर गार्डन चौक, कळमना गाव चौक, भरतवाडा चौक, कामगार नगर चौक, टिपू सुल्तान चौक, कपिलनगर चौक, दुर्गामाता मंदिर चौक, टेकानाका, कामठी रोड, अवस्थीनगर चौक / चोपडे लॉन, अशोक नगर चौक, सावरकर नगर चौक, शारदा चौक, तुकडोजी पुतळा चौक, टी. व्ही. टॉवर चौक, नंगा पुतळा चौक, रामनगर चौक, शिवणगाव बस स्टॉप, शितला माता चौक, उमरेड रोड, जयताळा चौक, बसवेश्वर चौक, संविधान चौक, अशोक चौक, घाट रोड, मानस चौक, बर्डी, मानेवाडा चौक, दिक्षाभुमी चौक, अजनी चौक, रहाटे चौक, लोकमत चौक, काँग्रेस नगर चौक, सोमलवाडा चौक, एयर पोर्ट चौक, छत्रपती चौक, लक्ष्मीनगर चौक, खामला चौक, जयताळा चौक, त्रिमुर्ती नगर चौक, पांढराबोळी चौक, प्रताप नगर चौक, अभ्यंकर नगर चौक, माटे चौक, श्रद्धानंद पेठ चौक, सुभाष नगर टी पॉईंट चौक, ट्राफिक वार्ड चौक, शंकर नगर चौक, रामनगर चौक, बजाजनगर चौक, पंचशिल चौक, झांसी राणी चौक, व्हेरायटी चौक, झिरो माईल चौक, R.B.I. चौक, संविधान चौक, महाराज बाग चौक, पत्रकार कॉलनी VHA चौक, मुंजे चौक, लॉ कॉलेज चौक, कॉफी हाऊस चौक, लक्ष्मी भवन चौक, जी. पी. ओ. चौक, भोले पेट्रोल पंप चौक, रविनगर चौक, विधान भवन चौक, आकाशवाणी चौक, एल. ए. डी. कॉलेज चौक व अन्य ठिकाणी सामुहिक गायनाचा कार्यक्रम होणार आहे.