तेजज्ञान फाउंडेशनचा रौप्यमहोत्सवी ध्यान महोत्सव रविवारी
Advertisement
नागपूर : तेजज्ञान फाउंडेशनतर्फे रौप्यमहोत्सवी ध्यान महोत्सवाचे नि:शुल्क आयोजन रविवारी (दि. २४) करण्यात आले आहे. वसंतनगर येथील दक्षिण अंबाझरी रोडवरील ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या सभागृहात (दीक्षाभूमी जवळ) दुपारी दोन ते पाच हा महोत्सव होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, लेखक निखिल चांदवाणी, सामाजिक प्रबोधनकर्त्या शेफाली दुधभडे हे उपस्थित असतील. तेजज्ञान फाउंडेशनची स्थापना तेजगुरू सरश्री यांनी केली असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. तेजज्ञान फाउंडेशन ही एक सेवाभावी संस्था असून गेली २५ वर्षे ध्यानाच्या माध्यमातून समाजात सकारात्मकतेची बीजे पेरण्याचे काम करत आहे. या महोत्सवात त्यांचे हजारो शिष्य सहभागी होणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून नागपूरवासियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.