Published On : Sun, Nov 29th, 2020

सिद्ध गोरक्षनाथ भगवान हे सर्वशक्तीमान योगी पुरुष आहेत – डॉ संजय उत्तरवार.

Advertisement

गोरक्षनाथ प्रगट दिन…कार्तिक शुद्ध 13 हा गोरक्ष नाथ ह्यांचा प्रगट दीन आहे. नुकताच २८ नोव्हेंबर लातो संपन्न झाला. गोरक्ष नाथ भगवान हे नवनाथ जागृत देव आहेत. नाथ संप्रदायाची स्थापना श्री मच्छिंद्रनाथ ह्यांनी केली. त्यांचे गुरू श्री दत्तप्रभू. श्री गोरक्षनाथ हे मच्छिंद्र नाथांचे शिष्य. आणि असा नाथ संप्रदाय वाढत गेला. श्री दत्तात्रय प्रभू नी नाथ संप्रदायाची दीक्षा   शंकर भगवान ह्यांच्या आदेशावरून ह्यांना दिली. आणि नाथ संप्रदाय सुरू झाला
आणि आदेश हा शब्द पण रूढ झाला. आम्ही नाथ पंथ मानणारे भक्त ,  एकमेकांना आदेश  म्हणून अभिवादन करतो. महाराष्ट्रात नाथांचे ठाणे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात आहेत. मी नगर ला असताना ह्या सर्व जागृत स्थाना ना भेट दिली आहे. तुम्ही पण वेळ मिळाला तर जरूर जा. नाथ संप्रदाय
मध्ये  कुठलाही बडेजाव नाही , सर्वांना सहज दर्शन उपलब्ध आहे. पश्चिम भारतात गिरनार गुजरात हे दत्त प्रभू आणि नाथांचे जागृत स्थान आहे. उत्तर भारतात गोरखपूर हे मोठं स्थान आहे. नेपाळ आणि हिमालयात पण नाथांची स्थाने आहेत.
 
दत्त जयंती ला गुरू पौर्णिमा असते व त्या दिवशी सगळ्या स्थानावर मोठा उत्सव असतो. जरूर जाऊन या एकदा.श्रीमद्भागवत पूरणाच्या अकराव्या   स्कांधात निमी राजाशी नवणारायानाचे संवाद झाले. हे नवनारायण म्हणजे रिषभ देवाच्या शंभर पुत्र पैकी देवांचे नऊ श्रेष्ठ भक्त. भगवान कृष्णाच्या 
गण्यानुसार त्यांनी विविध अवतार घेतले. कवी नारायण हा ऋषी झाला, हरी हा गोरक्ष, अंतरीक्ष हाजालिंदर झाला, प्रबुद्ध हा कानिफ झाला, पिप्पालयान हा
चारपटी झाला, आर्विहोत्रा हा वॉट्सिद्ध नागनाथ झाला. दृमिल हा भर्तरी झाला, चमस हा रेवांसिद्ध झाला आणि कर्भाजन हा गाहिनी झाला.

आदिनाथ शंकर व अग्निपुत्र दत्तात्रय ह्यांच्या आदेशाने आणि दिक्षेने नाथ पंथाचे मच्छिंद्र नाथा कडूनप्रवर्तन झाले. हे नऊ ऋषी हे नारायणाचे च अवतार आहेत
.घोर तप, अपूर्व भक्तिभाव, अनन्य श्रद्धा, ह्या जोरावर नव नाथांनी सिद्धी प्राप्त केली. ह्या सिद्धी च्या साहाय्याने त्यांनी अनेक चमत्कार केले.

पण सिद्धी चा कधी गैर उपयोग नाही केला. ह्या सिद्धी चा उपयोग त्यांनी समाजात निष्ठा, भक्तिभाव, ह्या गुणांची जोपासना व्हावी ह्या करता केला. नव नाथांचा चरित्र वरून निष्ठा, गुरू भक्ती, सेवा आणि त्याग ह्याची उत्तम शिकवण मिळते.अन्नदान करून सर्व जीवांना संतुष्ट करणे हे तत्त्वनवनाथ ह्यांनी अनुसरले होते. गुरू भक्ती आणि व्रत आचरण करून नरा ्चा नारायण होतो आणि तो देवा वर ही प्रभुत्व गाजवतो हे दाखवून दिले. नवनाथ भक्तीसार ह्या ग्रंथात नाथांचे चरित्र दिलेले आहे. हा ग्रंथ  धुंडी सुत मालू कवीने शके १७४१ मध्ये इस  १८१९-२० मध्ये लिहून पूर्ण केला. ह्या ग्रंथात चाळीस
अध्याय असून सात हजार ओव्या आहेत. हा पुराण ग्रंथ  अद्भुत असून फार प्रसिद्ध आहे. नाथा चे स्तोत्र खूप शक्ती शाली आहे. 

गोरक्ष जालंदर चर प टाष्य ,अडबंग कनिफ माचींद्रारद्या, चौरंगी रेवानक भर्त्री साज्ञा, भुम्या वभूर्वणाथ सिद्धा .

सी आर पी एफ गेट हिंगणा रोड नागपूर  येथे श्री लोखंडे गुरुजी स्थापित जागृत  गोरक्षनाथ मंदिर आहे. भाविक मंडळी ने दर्शनाचा लाभ घ्यावा.