Published On : Fri, Jun 19th, 2020

सिकलसेल हा एक जेनेटिक, अनुवांशिक आजार आहे- डॉ श्रद्धा भाजीपाले

Advertisement

कामठी :-सिकलसेल आजारामध्ये असामान्य हिमोग्लोबिन मुळे लाल रक्त पेशींचा आकार बदलतो या रक्तपेशींच्या बदलाला सिकलिंग असे म्हणतात तर सिकलसेल हा एक जेनेटिक व अनुवांशिक आजार असल्याचे मौलिक प्रतिपादन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ श्रद्धा भाजीपाले ह्या आज 19 जून जागतिक सिकलसेल दिनानिमित्त शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आयोजित सिकलसेल तपासणी कार्यक्रमात व्यक्त केले.

तसेच सिकलसेल रुग्णाकरिता इतर शासकीय सुविधा असुन संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1000 रुपयांची मदत, महात्मा फुले जिवनदायो योजनेचा लाभ, सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेच्यााावेळी प्रति तास 20 मिनिटे अतिरिक्त वेळ, महाविद्यालयीन तसेच बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी लेखनिकाची मदत , उपचारादरम्यान सिकलसेल रुग्ण व त्याच्या एका मदतनीसास मोफत एसटी प्रवास अशा सुविधा असल्याचे माहिती प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रतिभा कडू यांनी सांगितले .यावेळी शासकीय उपजिल्हा रुग्णालय तसेच गुमथी व गुमथळा या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा जागतिक सिकलसेल दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ श्रद्धा भाजीपाले, डॉ जयेश तांबे, डॉ चांदनखेडे, प्रतिभा कडू, अरुण नगराळे,सविता मेसरकर, दिलीप अडगुळकर, शंभरकर मॅडम, डॉ सबा , कपिल तराडे, अविनाश पूलकिल्लेवार, शारदा वाघमारे,वर्षा वानखेडे ,, आदींनी उपस्थिती दर्शवून विशेष वैद्यकीय सेवा पूरविली.

संदीप कांबळे कामठी