Published On : Fri, Mar 5th, 2021

NHAI-मनपाचे आंतरजोडणीच्या कामासाठी २४ तासांचे शटडाऊन 7 मार्च (रविवारी) रोजी

Advertisement

लकडगंज झोनमधील पारडी १, पारडी २ आणि भांडेवाडी जलकुंभांचा पाणीपुरवठा रविवारी राहणार बाधित


नागपूर: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी ७००मिमी व्यासाच्या मुख्य वाहिनीशी परडी आणि भांडेवाडी मुख्य वाहिनी सोबत आंतर जोडणी करण्यासाठी २४ तासांच्या शटडाऊनची विनंती केली आहे. NHAI राष्ट्रीय महामार्ग ६ वर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याचे काम करत आहे. याचाच भाग म्हणून ‘युटीलिटी शिफ्टिंग’ कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या याकामाला २४ तासांचा अवधी लागेल. हे काम मार्च ७ (रविवारी) रोजी सकाळी १० वाजेपासून सुरु होईल.

या २४ तास शटडाऊन दरम्यान रविवारी ७ मार्च पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

पारडी-१ जलकुंभ: महाजनपुरा, खाटिकपुरा, मातंगपुरा, डबलेवाडी, उडिया मोहल्ला, गजानन मंदिर परिसर, ठवकरवाडी, अंबे नगर, समता नगर, एकता नगर, दुर्गा नगर, सराई मोहल्ला, हनुमान मंदिर, सद्गुरू नगर, विनोबा भावे नगर, कोष्टीपुरा, राणीसती लेआऊट, जय दुर्गा नगर, रामभूमी १, रामभूमी २, सुंदर नगर, शेंडे नगर, दीप नगर, ई.

पारडी-२ जलकुंभ: तालपुरा, शारदा नगर, भवानी मंदिर, गणेश मंदिर परिसर, राम मंदिर परिसर, घटाटे नगर, अशोक नगर, रेणुका नगर, गंगाबाग, नवीन नगर, श्याम नगर, आभा नगर, भरतवाडा गाव, करारे नगर, पुनापूर गाव, शिवशक्ती नगर, ई.

भांडेवाडी जलकुंभ: राज नगर, बालाजी किराणा, वैष्णोदेवी नगर, श्रावण नगर, सरजू टाऊन, खांदवानी टाऊन, पवनशक्ती नगर, अन्तुजी नगर, तुलसी नगर, अब्बुमिया नगर, महेश नगर, मेहेर नगर, सरोदे नगर, साहिल नगर, ई.

शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

For any complaints regarding water supply or need information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.