File Pic
नागपूर: मनपा-OCW यांनी सीताबर्डी फोर्ट १ व २ जलकुंभ यांच्या आंतरजोडणीचे काम सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ५ डिसेंबर सकाळी १० दरम्यान हाती घेण्याचे ठरवले आहे.
येथे उल्लेखनीय आहे कि, मध्य नागपूरच्या वसाहतींचा पाणीपुरवठा दाब व कालावधी याबाबतींत सुधारण्यासाठी मनपा-OCWने सीताबर्डी फोर्ट (किल्ला) येथे मास्टर बॅलेन्सिंगरिझर्वॉयरची पुनर्बांधणी केली आहे.
या २४ तासांच्या आंतरजोडणीच्या कामामुळे खालील भागांचा पाणीपुरवठा सोमवार ४ डिसेंबर सकाळी १० ते ५डिसेंबर सकाळी १० रोजी बाधित राहणार:
सीताबर्डी फोर्ट १: बजेरिया,भोईपुरा मच्छी मार्केट, मराठी तेलीपुरा, संत्रा मार्केट, गंजीपेठ, फायर ब्रिगेड ऑफिस. भालदारपुरा, लोहारपुरा, नयापुरा हंसापुरी, खदान, सेवा सदन, ज्योती नगर, गांधीबाग, डागा हॉस्पिटल, नमकगंज, इतवारी पोस्ट ऑफिस, टोपरे गल्ली, पोथी गल्ली, बापूराव गल्ली, सुदाम गल्ली, हमालपुरा, इतवारी हायस्कूल, पाताळेश्वर रोड, दक्षिणामूर्ती चौक, चिटणीस पार्क परिसर, कोठी रोड, नर्सिंग टॉकीज मागचा भाग, शिंगाडा मार्केट, रहातेकर वाडी, काशीबाई मंदिर, जुनी मंगळवारी, टिळक पुतळा,, राम मंदिर गल्ली, अत्तरवाली गल्ली.
किल्ला महाल जलकुंभ: साई मंदिर भाग, हमालपुरा, कुंभारपुरा.
सीताबर्डी फोर्ट २: कॉटन मार्केट भाग, सुभाष रोड, गणेशपेठ, गाडीखाना, रामाजीची वाडी, कर्नलबाग, घाट रोड, शनिवारी S.T.स्टँड.
यादरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठाही शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
रेशीमबाग जलकुंभ स्वच्छता ४ डिसेंबर रोजी
प्रत्येक घराला स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरत मनपा-OCWने सलग चौथ्या वर्षी जलकुंभ स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत सोमवार दि. ४ डिसेंबर २०१७ रोजी रेशीमबाग जलकुंभ स्वच्छतेचे काम हाती घेण्याचे ठरवले आहे.
यामुळे दि. ४ डिसेंबर रोही पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: ओम नगर, शिव नगर, महावीर नगर, आनंद नगर, भगत कॉलोनी, रघुजी नगर, सुदामपुरी, जुने नंदनवन, तिरंगा चौक, नेहरू नगर, कबीर नगर, गायत्री नगर, लभानतांडा, गणेश नगर.
यादरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठाही शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.