Published On : Wed, Dec 4th, 2019

हभप प्रितम महाराज यांच्या सुमधुर वाणीने संगीतमय श्रीराम कथा

कन्हान : – श्रीसंत मुक्ताबाई महानंदा सेवा समिती कन्हान व्दारे रामायणाचार्य हभप प्रितम महाराज भोयर यांच्या सुमधुर वाणीने संगीतमय श्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन करून सुरूवात करण्यात आली.

शिवमंदिर, शिवनगर तारसा रोड कन्हान येथे रामायणाचार्य, धर्माचार्य, वारकरी सेवा भुषण हभप प्रितम महारा ज भोयर श्रीक्षेत्र पंढरपुर यांच्या सुमधुर वाणीने संगीत हभप अर्जुन महाराज सोनवाने, हभप कैलास महाराज (वाशीम) गायक हर्षल महाराज राऊत यांचा संगीतमय श्रीराम कथा सप्ताहाचे सोमवार दि.०२ ते ०९ डिसेंबर २०१९ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. यात दैनिक कार्यक्रम प्रात: ६ ते ७ काकडा भजन, सकाळी ७ ते ८ गिता पाठ व विष्णु सहस्त्रनाम, स. ८ ते ९ ञानेश्वरी पारायण, स. ९ ते ११.३० श्री रामकथा प्रवचन, दुपारी १ ते ३ ञानेश्वरी पारायण, दु. ३ते५ श्री रामकथा प्रवचन, सायं ५ते ६.३० हरिपाठ व भारूड, सायं ६.३० ते ९ वाजेपर्यंत हरिकिर्तन. सोमवार दि. २ ला गुरूवर्य हभप श्री सौरभ महाराज डोंगरे (वर्धा), दि.३ ला गुरूवर्य हभप परसराम महाराज कळंबे (नरखेड), दि.४ ला हभप गुरूवर्य विजय महाराज महाजन(श्रीक्षेत्र आळंदी), दि.५ ला हभप गुरूवर्य अक्षयानंद महाराज हरणे (पंढरपुर), दि.६ ला हभप गुरूवर्य गजराज महाराज राऊत (भंंडारा), दि. ७ ला हभप गुरूवर्य मधुकर महाराज पाचपुते चांदुर रेल्वे , दि. ८ ला हभप गुरूवर्य प्रविण महाराज काटकर श्रीक्षेत्र आळंदी आदीचे हरिकिर्तन रोज सायं. ६. ३० ते ९ वाजेपर्यंत होणार आहे.

विशेष कार्यक्रम शनिवार दि. ७ ला सकाळी ११.३० वा. श्रीसंत मुक्ताबाई तिरोधान सोहळा प्रित्यर्थ हभप सुश्री महानंदाताई शिक्षिका यांचे हरिकिर्तन, रविवार दि.८ ला दुपारी ३ वा. प्रवचन आणि ग्रंथपुजन दुपारी ४ ते ६ वा. मिरवणुक दिंडी सोहळा . सोमवार दि.९ ला सकाळी ९ ते ११ वा. हभप गुरूवर्य प्रितम महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन आणि दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसाद

श्री राम कथा सप्ताहाचा परिसरातील भाविकांनी उपस्थित पाहुन लाभ घ्यावा असे आवाहन संयोजिका सुश्री महानंदा ताई अध्यक्षा श्रीसंत मुक्ताबाई महानंदा सेवा समिती कन्हान, श्री मोहनराव मोखारकार, श्री भगवानजी भुसारी हयानी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता श्रीसंत मुक्ताबाई महानंदा सेवा समिती कन्हान, बेले सर एज्युकेशन कन्हान, मॉ वैष्णवी दुर्गोत्सव मंडळ शिवनगर कन्हान, बेले सर एज्युकेशन कन्हान आणि समस्त भाविक मंडळी कन्हान सहकार्य करीत आहेत.