Published On : Wed, Dec 4th, 2019

स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि महाराणी सिल्विया

यांची राज्यपालांची सदिच्छा भेट

स्वीडनचे राजे कार्ल (सोळावे) गुस्ताफ आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, अशोक हिंदूजा, संजीव बजाज, स्वीडनमधील भारताच्या राजदूत मोनिका मोहता आदि उपस्थित होते.

यावेळी उभय देशातील सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक सलोखा वृद्धिंगत व्हावा यासाठी चर्चा करण्यात आली. मंत्री सुभाष देसाई व मुख्य सचिव श्री. मेहता यांनी राज्यातील औद्योगिक परिस्थिती संदर्भात माहिती दिली. उपस्थित उद्योगपतींसोबतही यावेळी अनौपचारिक चर्चा झाली.