Published On : Tue, Nov 13th, 2018

रामटेक येथे श्रीमद भागवत कथा संपन्न:कथाव्यास प.नंदकिशोरजी पांडेय यांच्या वाणीने भक्त मंत्रमुग्ध

Advertisement

ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले शुभाशीर्वाद।

रामटेक : नुकतेच रामटेक येथे श्रीराम यज्ञ समिती रामटेक च्या वतीने आयोजित अष्टोत्त्तर शत भागवत कथा ,पंचकुंडीय श्रीराम यज्ञ भक्तिमय उत्साहात संपन्न झाले.दररोज सकाळी यज्ञ,सायंकाळी रामलीला आणि दुपारी 2 ते 7 पर्यंत कथाव्यास पंडित नंदकिशोरजी पांडेय यांच्या सुश्राव्य व ओजस्वी वाणीतून श्रीमद भागवत कथा कार्तिक मासाच्या शुभ पर्वावर ऐकण्याचे भाग्य रामटेक नगरीला मिळाले. सात दिवस चाललेल्या या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमात लोकांनी मोठया प्रमाणावर सहभाग घेतला होता.दररोज चालणाऱ्या भागवत कथेतून महाराजानी मनुष्य जीवनात देव,धर्म,अध्यात्म,राष्ट्रजीवन,सामाजिक जीवन आणि त्यातही मानव जन्म लाभल्यावर ते जीवन सूंदर आणि मंगलमय कसे करावे याविषयी महाराजांनी वेगवेगळे उदाहरण देऊन समजावून सांगितले.

भागवत कथेत सुरुवातीपासुन तर प्रभू श्रीराम चंद्र याचे जीवन कर्तृत्व ,भगवान श्रीकृष्ण याचे जीवन कर्तृत्व आणि सोबत भागवतातील अनेक कथांचा आधार घेऊन नरजन्माचे सार्थक करण्यासाठी भक्तिमय व प्रसन्न जीवन जगावे असे कथाव्यास पंडित नंदकिशोरजी पांडेय महाराज यांनी सांगितले. भागवत कथेनंतर सुरू होणाऱ्या चित्रकूटच्या रामलीलेने रसिकांची मने जिंकली. रोज संध्याकाळी चालणाऱ्या रामलिलेने प्रभू रामचंद्र याचं पूर्ण जीवनचरित्र उलगडून दाखविले.

कार्यक्रमाकरिता कथाविश्रांतीच्या दिवशी ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तथा नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भागवत कथामांचावर भागवताचार्य नंदकिशोरजी पांडेय यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले.यावेळी महाराजजीनी शाल,श्रीफळ,पुष्पमाला घालून त्यांना आशीर्वाद दिला यावेळी उपस्थित असलेले आमदार मल्लिकार्जुन रेड्डी,नगराध्यक्ष दिलीप देशमुख, विकास तोतडे व अन्य मान्यवरांनाही शाल,श्रीफळ व पुष्पमाला घालून महाराजजीनी आशीर्वाद दिला.कथाविश्रांती च्या दिवशी ब्राम्हभोज व त्यानंतर महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

श्रीराम यज्ञ समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी श्रीमद भागवत कथेच्या सफलतम व यशस्वी होण्यासाठी अविरत प्रयत्न केले.कार्यक्रमाचे संचालन जगदीश गुजरकर यांनी यशस्वीरित्या केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विकास दुबे, सुनील रावत, अनुराग दुबे, पिंटू शर्मा,प्रतीक राघोर्ते, पियुष भरणे,जय कस्तुरे,रोहित संगेवार ,लक्की चौकसे, संजय खजुरे,शुभम जयस्वाल, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राकेश मर्जीवे तसेच सर्व भाविक गण यांनी मोलाचे सहकार्य केले.