Published On : Thu, Sep 30th, 2021

श्री संत गजानन सोसायटीने प्लाटधारकांची केली फसवणूक व जमिनीची केली विक्री

नागपूर : संत गजानन महाराज गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मौजा ( बीडीपेठ )चे आम्ही सही करणार प्लांटधारकांनी 19 मे 1981 रोजी संस्थेचे माजी अध्यक्ष पुंडलिक डोमाजी सोनवणे, अयोध्या नगर यांच्याकडून सर्व प्लाट विकत घेतले. सर्व प्लॉट ले आउट 572 मध्ये येतात. एकूण प्लॉट पैकी 200 प्लॉट प्रत्येक प्लाटधारकांच्या नावाने रजिस्टर्ड असून पक्की घरे बांधून राहत आहोत.

मात्र सुधाकर नथुजी सहारे शुभांगी गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या नावाने काही ओळखीच्या आधारे काही लोकांना प्लांट विकले. आम्ही खरे मालक असताना ना. स. प्रन्यास ने अन्य संस्थेच्या नावाने त्याला मंजुरी कशी दिली ? हा आमचा सवाल आहे. आम्ही यासंदर्भात नागपूरचे जिल्हाधिकारी नागपूर, महानगरपालिकेचे आयुक्त, आणि नागपूर शहर पोलीस आयुक्तांना दि. १९ /११ /२०२० ला निवेदन दिली.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सहारे व त्यांच्या संस्थेवर कारवाईची मागणीही केली. मात्र अजून पर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही. एकूण च झालेल्या प्रकार तसेच सहारे यांच्या बाबत गुंड प्रवृत्तीचे असल्याची माहिती लक्षात घेऊन अनेक प्लॉटधारक दहशतीत आहे. आपण आमच्या वरील अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यास सहकार्य करावे. ही विनंती माजी सैनिक नारायण ल. भुरे यांनी पत्रपरिषदेत मागणी केली आहे.

पत्रपरिषदेला संबोधित करतेवेळी नारायणराव भुरे, उत्तमराव खराबे, नरेश बेरड, यावेळी उपस्थित होते.