Published On : Tue, Oct 9th, 2018

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत श्रीपाद काळे यांना सुवर्ण पदक

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र स्टेट वेटर्न्स ॲक्वाटीक्स असोसिएशन्च्या अधिपत्त्यात गोंदीया जिल्हा मास्टर्स ॲक्वाटीक्स असोसिएशनतर्फ़े गोंदीया येथील जिल्हा क्रिडा संकूल तलाव येथे नुकत्याच पार पडलेल्या 21 व्या राज्यस्तरीय मास्टर्स ॲक्वाटीक्स स्पर्धेत श्रीपाद काळे यांनी 100 मीटर्स बॅकस्ट्रोक स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवित सुवर्ण पदक पटकाविले तर 100 मीटर्स फ़्री स्टाईल स्पर्धेत उपविजेते पद मिळवित रजत पदक पटकाविले.

राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री तथा गोंदीया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते श्रीपाद काळे यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. श्रीपाद काळे यांनी आजवर अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत नेत्रदिपक कामगिरी केलेली आहे.

मागिल वर्षी कोल्हापूर येथे झालेल्या 20 व्या राज्यस्तरीय मास्टर्स ॲक्वाटीक्स स्पर्धेत त्यांनी कास्य पदक तर त्यापुर्वी वर्धा यथे झालेल्या 19व्या राज्यस्तरीय मास्टर्स ॲक्वाटीक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते.

महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या उमरेड शहर (2) शाखा कार्यालयात सहाय्यक अभियंता कार्यर असलेल्या श्रीपाद काळे यांच्या या कामगिरीबद्दल महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, नागपूर ग्रामिण मंडलाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफ़ुल लांडे आणि त्यांच्या सहका-यांनी काळे यांचे अभिनंदन केले आहे.