Published On : Sun, Sep 19th, 2021

पक्षविरोधी कार्य करीत असलेल्या नेत्यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवा

सावनेर – पक्षात राहून स्वपक्षातील नेत्यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या लोकांना पक्षातून बाहेर काढावे असे वक्तव्य युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल सीरिया यांनी ग्रामीण काँग्रेस कमेटी तर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात केले. मागील काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे मंत्री सुनील केदार यांच्याविरोधात उघडपणे वक्तव्य केल्यामुळे आशिष देशमुख यांना पक्षातून निलंबित करण्यात यावे असा ठरावच युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सीरिया यांनी मांडला आहे. या ठरावाला काँग्रेस नेत्री कुंदा राऊत व जेष्ठ काँग्रेसी दयाराम भोयर यांनी अनुमोदन दिले.

त्याचप्रमाणे अनेक जेष्ठ काँग्रेस नेत्यांनी सदर प्रस्तावाला पाठिंबा दिला. आपल्या वक्तव्यात राहुल सीरिया यांनी सांगितले की पक्ष विरोधी वक्तव्य करणारे नेते हे पक्षातून काढलेल्या लोकांना सोबत घेऊन जिल्ह्यात फिरत आहे परंतु यानंतर युवक काँग्रेस हे खपवून घेणार नाही व अश्यांना युवक काँग्रेसच्या स्टाईलने प्रतिउत्तर देण्यात येईल.

यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाशी बेईमानी करणाऱ्याला युवक काँग्रेसने चांगला धडा शिकवावा. मी सदैव युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यां सोबत आहे. युवक काँग्रेस हा काँग्रेस पक्षाच्या पाठीचा महत्वाचा कणा आहे आणि कण्याला मी नेहमीच आधार देणार असल्याचे सुद्धा सुनील केदार यांनी म्हटले.

या कार्यक्रमात प्रमुख रूपाने नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ रश्मी बर्वे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश पदाधिकारी किशोर गजभिये, अतुल लोंढे, नंदा पराते, तक्षशिला वाघधरे, उमाकांत अग्निहोत्री, कमलेश समर्थ, संजय महाकाळकर, संदेश सिंघलकर,संजय मेश्राम, विजय बारसे, त्याचप्रमाणे युवक काँग्रेस चे तौसिफ खान, अमोल केने, अनुराग भोयर, फैजल नागानी, निखिल पाटील, निखिल पाटील, संजय जगताप, फजलूर कुरेशी, भीमराव कडू, व मोठ्या प्रमाणात काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दिनेश दमाहे