Published On : Fri, Jan 31st, 2020

ठेकेदार व अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस

Advertisement

नागपुर – नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी सिमेंट रोड निर्माण कार्यात दिरंगाई बदलणा-या ठेकेदार कंपनी जे.पी. इंटरप्राईजेस, क्वालीटी कंट्रोलचे काम पाहणारी क्रीयेशन इंजिनीयर्स प्रा. लि. आणि म.न.पा.चे कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून तीन दिवसात त्यांनी आपली बाजू मांडण्यास निर्देश दिलेले आहेत.

जर त्यांचे उत्तर समाधानकारक नसेल तर कंपनीला काळया यादीत टाकण्यात येईल. म.न.पा. इंजिनियरला 24 तासाचा आत आपले स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश सु्ध्दा आयुक्तांनी दिले.

सिमेंट कॉक्रींट रस्ते प्रकल्प (टप्पा-3) रस्ता क्र.31 एकस्तंभ चौक ते उत्तर अंबाझरी रस्याींचे (अजीत बेकरी रोड) वरील पेव्हर ब्लॉक मानकाप्रमाणे आवश्यक एम-45 चे नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालावरुन आढळून आले आहे. प्रत्यक्षात बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक हे (Curing period) पूर्ण होण्याआधीच लावण्यात सुरुवात केली असल्याचे निर्देशनास आले आहे.

याकामात दिरंगाई असल्याकारणामुळे या तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे।