Published On : Fri, Jan 31st, 2020

बिनाकी उपविभागात ३५ तक्रारीचे निराकरण – महावितरण ग्राहक संपर्क मेळावा

Advertisement

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: महावितरणच्या बिनाकी उपविभागात घेण्यात आलेल्या ग्राहक संपर्क मेळाव्यात ३५ वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले.

महावितरणकडून या परिसरातील वीज वितरणाची जवाबदारी सप्टेंबर-२०१९ पासून स्वीकारल्यावर या परिसरातील वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी प्रलंबित होत्या. वीज ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी उपविभागीय पातळीवर ग्राहक संपर्क मेळावे आयोजित करून तक्रारी दूर करण्याच्या प्रयत्न महावितरण प्रशासनाकडून सुरु करण्यात आला आहे.

बिनाकी उपविभागात आयोजित ग्राहक मेळाव्याचे उदघाटन महावितरणच्या गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोड यांच्या प्रमुख उपस्थित नगरसेवक संजय चावरे यांच्या हस्ते करण्यात आले. तक्रार निवारण मेळाव्यात देयका विषयी तक्रार ५, वीज दरबदल ३, मीटर तक्रार २, मीटर स्थलांतरण १, नवीन पोल व पोल स्थलांतरण ११, नवीन वीज जोडणी ५, इतर तक्रार ८ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले.

पुढील आठवड्यात शांतीनगर,वर्धमान नगरला मेळावे
वीज ग्राहकांचा मेळाव्यास मिळणारा प्रतिसाद बघून गांधीबाग विभागाच्या वतीने पुढील आठवड्यात शांतीनगर, वर्धमान नगर आणि गांधीबाग येथे ग्राहक संपर्क मेळावे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे यांनी दिली आहे. ४ फेब्रुवारी रोजी शांतीनगर पेट्रोल पुम्पजवळील वीज उप केंद्रात आयोजित मेळाव्यात शांतीनगर, तुलसी नगर, प्रेम नगर, कळमना बाजार, वांजरा,महेश नगर येथील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल.

५ फेब्रुवारी रोजी वर्धमान नगर चौकात असलेल्या उप विभागीय कार्यालयात वर्धमान नगर, कावरा पेठ, दाना गंज, सतरंजीपुरा,सतनामी नगर येथील वीज ग्राहकांच्या तर ६ फेब्रुवारी रोजी गांधीबाग उद्यानाजवळील कार्यालयात मस्कासाथ रोड, इतवारी, खदान,गांधीबाग,निकालस मंदिर,जागनाथ बुधवारी,येथील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. तक्रार मेळाव्यास उपस्थित राहते वेळी वीज ग्राहकांनी आवश्यक कागदपत्र सोबत आणावीत,असे महावितरणकडून कळविण्यात आले.