नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केली. अजितदादांनी सरकारमध्ये येत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याला दोन मुख्यमंत्री मिळाले.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस आहे. या पार्श्वभूमिवर नागपूरात लावण्यात आलेल्या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना ही दोस्ती तुटायची नाय असे बॅनर लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून नागपूरात हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर “ही दोस्ती तुटायची नाय” असं लिहून त्याखाली “राजकारणातील ‘दादा’ अजीत दादा, राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा” असे कॅप्शन देण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले.