Published On : Mon, Jul 20th, 2020

कोव्हिड- 19 बाबत नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना दंड

Advertisement

“मिशन बिगीन अगेन” च्या अंतर्गत राज्य शासनाने लॉकडाऊन ‍शिथिलतेबाबत निर्देश निर्गमित केले आहे. या दिशा निर्देशानुसार नागपूर शहरातील जीवनावश्यक सेवा व्यक्तिरिक्त दुकाने व बाजर सम-विषय तत्वावर सुरु करण्यात आलेले आहे. तसेच दुकाने सुरु ठेवण्याकरीता वेळ ही निश्चित करण्यात आली आहे. तसेच दुकाने व मार्केट मध्ये येत असलेल्या नागरिकांनी ‍त्रिस्तरीय फेस मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

परंतु महानगरपालिकेने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे गांभीर्याने पालन होत नसल्याचे ‍निर्दशनास येत असल्याने मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. या आदेशानुसार दुकानदारांकडून नियमांचे योग्य पालन होत नसल्याचे आढळून आल्यास संबंधित दुकानदारांकडून पुढीलप्रमाणे दंड आकारण्यात येईल.

१. पहिल्यावेळी ‍ निर्देशाचे उल्लंघन करणे – रु. ५०००/- दंड

२. दुस-यावेळी निर्देशाचे उल्लंघन करणे रु. ८०००/- दंड

३. तिस-यावेळी निर्देशाचे उल्लंघन करणे रु. १०,०००/- दंड

त्याच बरोबर उपरोक्त नमूद दंडात्मक तरतूदी व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार सर्व संबंधित हे फौजदारी गुन्हा दाखल करणेस तसेच परवाना रद्द करणे/दुकान बंद करणे या सारख्या कारवाईस पात्र राहतील.

या आदेशाची अंमलबजावणी व दंडात्मक कारवाई करण्यास्तव नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधित झोनचे सहाय्यक आयुक्त व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, सर्व संबंधित पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे पोलिस अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.