Published On : Mon, Oct 7th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपला धक्का देत हर्षवर्धन पाटील यांनी हजारो समर्थकांसह केला शरद पवार गटात प्रवेश

Advertisement

इंदापूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. यातच इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतल्याने आता इंदापुरात भाजपला मोठे खिंडार पडले आहे.

Advertisement
Today's Rate
Wed 11 Dec. 2024
Gold 24 KT 78,100/-
Gold 22 KT 72,600/-
Silver / Kg 94,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

इंदापूरमध्ये आज शरद पवार गटाची जाहीर सभा पार पडली. या सभेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवार गटात जाहीरपणे पक्षप्रवेश केला.

या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते. तसेच सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, उत्तमराव जानकर हे देखील व्यासपीठावर हजर होते.

Advertisement