Published On : Thu, Nov 21st, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील टेलिफोन एक्सचेंज परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

Advertisement

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यातच आज शहरातील लकडगंज पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या टेलिफोन एक्सचेंज परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. या व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान लकडगंज पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्यासाठी पुढील तपास सुरु केला.

पोलिसांनी या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.