Published On : Mon, May 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

श्रीमती शिवानी दाणी-वखरे आणि श्री. शेषराव गोतमारे यांनी स्वीकारला एनआयटी विश्वस्त पदाचा कार्यभार

Advertisement

नागपूर,: नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे आणि नगरसेवक श्री. शेषराव गोतमारे यांनी सोमवारी (ता. ११) नागपूर सुधार प्रन्यास च्या (एनआयटी) विश्वस्त पदाचा कार्यभार स्वीकारला. नागपूर सुधार प्रन्यास येथे आयोजित छोटेखानी पदग्रहण समारंभात महापौर श्रीमती निता ठाकरे आणि जिल्हाधिकारी तथा एनआयटी प्रभारी सभापती श्री. कुमार आशीर्वाद यांनी दोन्ही नवनियुक्त विश्वस्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार प्रा. श्री. अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, क्रीडा समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती सारिका नांदूरकर, जलप्रदाय समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, कर आकारणी व कर संकलन समिती सभापती श्रीमती सरिता कावरे, जलप्रदाय समिती उपसभापती श्री. पिंटू झलके, शिवसेना गटनेते श्री. गणेश चर्लेवाल, नगरसेवक श्री. योगेश पाचपौर, नगरसेविका श्रीमती सुषमा चौधरी, श्रीमती अभिरुची राजगीरे, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. श्री. संजय भेंडे यांच्यासह इतर नगरसेवक व नगरसेविका प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी बोलताना नवनियुक्त विश्वस्त श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवून या पदावर नियुक्ती केल्याबद्दल आभार मानले. पक्षाने माझ्यावर जी मोठी जबाबदारी सोपविली आहे, त्या संधीचे सोने करून नागरिकांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे त्या म्हणाल्या. तसेच, एनआयटीमधील प्रलंबित प्रश्न, गोंड राजे समाधी, दीक्षाभूमीचा विकास आणि अनधिकृत ले-आउटचे व इतर रखडलेले विषय मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

नवनियुक्त विश्वस्त श्री. शेषराव गोतमारे यांनीही पक्षाचे आभार मानले. विश्वस्त पदाची जी जबाबदारी पक्षाने सोपविली आहे, तिला कटिबद्ध राहून मी माझे कर्तव्य पार पाडेन. एनआयटीमधील अनधिकृत ले-आउटसह इतर महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याला माझे प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले. औपचारिक पदग्रहण सोहळ्यासाठी एनआयटी कार्यालयात भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वांनी या नियुक्तीचे उत्साहात स्वागत केले.

Advertisement
Advertisement
गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews

गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews

गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news

गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news

25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate  #nagpurnews

25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate...

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha #news

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha...

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate #maharashtra

किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges